शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १९४ कोटी गोळा करणारी संशोधन संस्था निघाली बनावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 06:02 IST

गरीबांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याच्या नावे स्थापन केलेल्या संस्थेने वैज्ञानिक संशोधनासाठी ठिकठिकाणाहून गेल्या चार वर्षांत १९४ कोटींच्या देणग्या वसूल केल्या.

- मनीषा म्हात्रे मुंबई : गरीबांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याच्या नावे स्थापन केलेल्या संस्थेने वैज्ञानिक संशोधनासाठी ठिकठिकाणाहून गेल्या चार वर्षांत १९४ कोटींच्या देणग्या वसूल केल्या. पण ती संस्था बनावट असल्याचे प्राप्तिकर खात्याच्या चौकशीत उघड झाले असून त्या संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंधेरीतील उमेश नागदा (५५) याने चार वर्षांपूर्वी साथीदारांच्या मदतीने ‘श्री अरविंदो इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅप्लाइड सायंटिफिक रिसर्च ट्रस्ट’ स्थापन केला. अंधेरीत त्याचे कार्यालय आहे, असे सांगून, शैक्षणिक संस्था व लोकांकडून त्यांनी देणग्या गोळा करणे सुरू केले. करसवलत मिळावी, म्हणून संस्थेने गेल्या वर्षी प्राप्तिकर विभागाकडे अर्ज केला. त्यावर प्राप्तिकर विभागाला संशय आल्याने उपायुक्त विजयकुमार मांगला यांनी तपास सुरू केला. केंद्राच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक संशोधन विभागाशीही पत्रव्यवहार केला. तेव्हा या ट्रस्टचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे कळवले. ही संस्था बनावट असल्याचे आणि त्यांनी गोळा केलेल्या रकमेवरील ५८ कोटी ५९ लाखांचा कर थकवल्याचेही आढळून आले.>आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपासही फसवणूक उघड झाल्याने प्राप्तिकर उपायुक्तांनी संस्थेविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी दिली.

टॅग्स :fraudधोकेबाजी