शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतून २४ वेठबिगारांची सुटका; कामासाठी जबरदस्ती; श्रमजीवी संघटनेचा वीटभट्टीवर छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 13:29 IST

१८ बालकांचा होता यात समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क, पडघा: भिवंडी तालुक्यातील मैंदे गावाजवळ शेंडेपाडा येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या ११ कुटुंबांतील तब्बल २४ वेठबिगार मजुरांची सुटका करण्यात आली. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि कार्यकर्त्यांनी छापा टाकत येथील मालकाच्या दहशतीखाली असलेल्या या मजुरांना गुलामगिरीतून मुक्त केले. यात १८ बालकांचा समावेश आहे.

घटनास्थळी महसूल विभाग आणि पोलिसांना कळवून मजूर राजेश दशरथ मुकणे यांच्या फिर्यादीनुसार मालक शशिकांत पाटील याच्याविरुद्ध पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वीटभट्टी मालक पाटील याच्याकडून राजेश याने गेल्यावर्षी २० हजार रुपयांचा बयाणा घेतला होता.

यानंतर राजेश याने गेल्यावर्षी शेंडेपाडा (मैंदे)  येथे त्यांच्या वीटभट्टीवर विटा थापण्याचे काम केले. राजेशची पत्नी मीना गरोदर असल्याने बाळंतपण करताना तिचे सिझेरियन झाले तेव्हा ३२ हजार रुपये खर्च केल्याचे मालकाने राजेश याला सांगितले.

वीटभट्टीवर वेठबिगारीकरिता जुंपले

एकूण ५२ हजार रुपये राजेश आणि कुटुंबाच्या अंगावर मालकाने लावले होते. बदल्यात पाटील यांनी राजेश व त्याच्या पत्नीला आपल्या वीटभट्टीवर वेठबिगारीकरिता जुंपले. यावेळी अमानुष वागणूक देणे तसेच मारहाणही करण्यात आली. मालकाचा अन्याय सहन न झाल्याने राजेश कामावर जायला तयार नव्हता, म्हणून त्याने इतर एका मालकांकडून उचल घेत शशिकांत यांचे पैसे परत देण्याची तयारी दाखवली. मात्र, ‘तुला माझ्याकडेच कामाला यावे लागेल. तुझ्या अंगावर माझे पैसे आहेत. कसा येत नाही ते मी पाहतो. तू आताच्या आता गाडीत बस’ असे सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी