शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Aftab Case: "मला बाहेर काढा, नाहीतर तो आज रात्रीच माझा जीव घेईल..", दुर्दैवाने श्रद्धाची भिती खरी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 14:38 IST

आफताब पासून जीवाला धोका असल्याचा श्रद्धाला आधीच आला होता संशय

Shraddha Murder Case: महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. तिचा प्रियकर आफताब आमीन पुनावाला याने तिची आधी हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना उघडकीस आली. श्रद्धा वालकर (Shraddha Walker) ही तरूणी आफताब बरोबर दिल्लीमध्ये वास्तव्यास होती. त्यावेळी आफताबने (Aaftab Poonawala) तिचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर तो हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी टाकत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. पण याच दरम्यान, आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताबसोबत दिल्लीत असताना आपल्या जीवाला धोका आहे, असा अंदाज श्रद्धाला आधीच आल्याचे तिच्या एका मित्राने सांगितले.

श्रद्धा ही २६ वर्षीय तरुणी होती. तिचे मुंबईत आफताबशी प्रेम जुळले. त्यानंतर ते दोघे दिल्लीला शिफ्ट झाले. तेथे श्रद्धाने आफताबकडे लग्नासाठी हट्ट धरला. त्या हट्टाला कंटाळून त्याने दिल्लीत तिचा खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर जंगलातल्या वेगवेगळ्या भागांत फेकले, असा खुलासा पोलिस तपासा झाल्याचे सांगण्यात येत आले. पण श्रद्धाच्या एका मित्राने सांगितल्याप्रमाणे, आफताब श्रद्धाला दगाफटका करू शकतो असा श्रद्धाला आधी संशय आला होता.

मित्राने केला धक्कादायक खुलासा

श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर याने सांगितले, "श्रद्धाचा एके दिवशी मला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की तिला त्या घरातून बाहेर निघायचे आहे. जर त्या रात्री ती आफताब बरोबर त्या घरात राहिली तर तो तिला मारून टाकेल. मला श्रद्धाची काळजी वाटली. मी तिला संपर्क करण्याचा प्रयत्न जुलैपासून करत होतो. तिच्याकडून काहीच रिप्लाय आला नाही. तिचा फोनदेखील स्विच ऑफ होता. अखेर तिच्या काही मित्रांकडे चौकशी केल्यानंतर मी तिच्या भावाला फोन केला आणि आम्ही पोलिसात गेलो."

अफताब श्रद्धाला मारहाण करायचा!

"श्रद्धा आणि आफताब हे दोघे २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. सुरूवातीच्या काळात त्यांच्यात खूप प्रेम होतं. ते दोघे अतिशय सुखात आणि आनंदी राहत होते. पण नंतर श्रद्धाने सांगितले की आफताबने तिला मारहाण करायला सुरूवात केली. तिला आफताबला सोडून वेगळं व्हायचे होते, पण तिला ते काही कारणामुळे जमलं नाही. अखेर ते लोक नोकरीच्या निमित्ताने दिल्लीला शिफ्ट झाले," अशी माहिती श्रद्धाचा मित्र रजत शुक्ला याने दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीMumbaiमुंबई