शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्या बापाचे माझ्या नावापुढील नाव काढून टाका; पीडित मुलीची न्यायाधीशांना आर्जव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 08:27 IST

सज्ञान होताच न्यायाधीशांना केली विनंती; न्यायालयाने आराेपी वडिलास ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

ठळक मुद्दे निर्दयतेचा कळस गाठत आरोपीने पीडितेच्या तोंडावर कपडा बांधून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या सहनशक्तीचा बांध फुटल्यानंतर तिने पुलगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. 

वर्धा : स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नात्याला काळिमा फासण्याची घटना देवळी तालुक्यातील दहेगाव (धांदे) येथे चार वर्षांपूर्वी घडली. या प्रकरणात न्यायालयीन साक्ष नाेंदविल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीने चक्क ‘माझी वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका’ अशी आर्जव न्यायाधीशांना केली. तिच्या या विनंतीमुळे दुष्कृत्य करणाऱ्या बापाविषयी किती घृणा आहे, हे स्पष्ट हाेते. या प्रकरणात अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी निकाल देताना नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा ठाेठावली. 

शिक्षेस पात्र ठरलेला आरोपी देवळी तालुक्यातील दहेगाव (धांदे) येथील रहिवासी आहे. आरोपी हा पीडितेचा जन्मदाता बाप आहे. तिच्या आईचा ती लहान असतानाच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने दुसरे लग्न केले. आरोपी हा पूर्वी दारूविक्रीचा व्यवसाय करायचा, तसेच आरोपीच्या त्रासामुळे पीडिता ही एका बालगृहात राहून शिक्षण घेत होती. दरम्यान, १ ऑगस्ट २०१७ ला आरोपी १३ वर्षीय पीडितेला घरी घेऊन गेला. त्यानंतर मध्यरात्री घरातील इतर सदस्य झोपून असताना कुणाला आवाज येऊ नये म्हणून निर्दयतेचा कळस गाठत आरोपीने पीडितेच्या तोंडावर कपडा बांधून तिच्यावर बलात्कार केला. शिवाय घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली होती. पीडितेच्या सहनशक्तीचा बांध फुटल्यानंतर तिने पुलगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नाेंद घेतली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सपना निरंजने यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

शिक्षेचे स्वरूप असेया प्रकरणावर निकाल देताना न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ नुसार जन्मठेप तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पीडिताला भविष्यात जगण्यासाठी तसेच शिक्षणाकरिता मदत व्हावी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा अंतर्गत तसेच मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक भरपाई देण्याचे आदेश दिले.

सहा साक्षीदारांची तपासली गेली साक्षया प्रकरणी शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी न्यायालयात मांडली. न्यायालयात एकूण सहा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार अनंत रिंगणे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय