शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच; चढ्या दराने विक्री करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 20:40 IST

Remdesivir's black marketing : दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांच्याकडून रेमडेसिविरची ५ इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देमीरारोड भागात रेमडीसीवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकली जात असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे याना मिळाली.

मीरारोड - मीरारोडमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात तब्बल १६ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या योगेश संतोष पवार (२१) रा. वांद्रे व अस्मिता नारायण पवार (२१) रा . नालासोपारा ह्या दोघांना पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने अटक केली आहे. दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांच्याकडून रेमडेसिविरची ५ इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.मीरारोड भागात रेमडीसीवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकली जात असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे याना मिळाली. काळे यांच्या पोलीस पथकाने लाईफ लाईन रुग्णालयात काम करणारी अस्मिता हिच्याकडे इंजेक्शनसाठी बनावट गिऱ्हाईक पाठवले असता तिने योगेशला सांगितले. योगेशने बोरिवलीच्या खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिलेस कळवले. एका इंजेक्शनची १६ हजार रुपये किंमत ठरवून योगेश व अस्मिताला भाईंदर उड्डाणपुला खाली असलेल्या शिधावाटप कार्यालयाजवळ पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून एकूण ५ इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत.  पोलिसांनी दोघांना अटक करून नया नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपीना ठाणे न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे . पुढील तपास नयानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहेल पठाण हे करीत आहेत.  योगेश हा महापालिकेने कंत्राटी पद्धतीने चालवण्यास दिलेल्या भाईंदरच्या प्रमोद महाजन कोविड उपचार केंद्रातील आयसीयू विभागात काम करणारा आहे. महाजन उपचार केंद्रात मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या नातलगाकडे रेमडेसिविरचे १ इंजेक्शन शिल्लक होते . ते ४ हजार ८०० रुपयांना नातलगाने त्याला विकले होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.  पोलीस बोरिवलीच्या रुग्णालयातील त्या महिलेचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Arrestअटकmira roadमीरा रोडPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीय