शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

परमबीर सिंग यांना दिलासा; अटक वॉरंट कोर्टाने केले रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 18:55 IST

Parambir Singh : ठाणे न्यायालयाने सिंग यांना दोन अटी घातल्या असून जेव्हा तपास अधिकरी बोलावतील तेव्हा तपासला उपस्थित राहायचे आणि १५ हजाराचा  वैयक्तिक जामिनावर भरावा लागणार आहे. 

ठाणे: सर्वोच्च न्यायालयाकडून आधीच संरक्षण मिळविलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी तथा मुंबईचे आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरुद्ध काढलेले अटक वॉरंट ठाण्याचे मुख्यन्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांनी अखेर शुक्रवारी रद्द केले. १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलका तसेच एक वैयक्तिक जामीन ३ डिसेंबरपर्यंत देण्याच्या अटीवर न्यायालयाने त्यांना हा दिलासा दिला.

ठाणेनगर पोलीस ठाण्यात क्रिकेट बुकी सोनू जालान आणि व्यावसायिक केतन तन्ना यांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्हयात वारंवार समन्स बजावूनही परमबीर हे गेल्या सहा महिन्यांपासून हजर होत नव्हते. अखेर त्यांच्याविरुद्ध ठाणो न्यायालयाने विनाजामीन अटक वारंट जारी केले होते. याच पार्श्वभूमीवर परमबीर हे आपले वकील राजेंद्र मोकाशी यांच्यासह आधी ठाणेनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. त्यापाठोपाठ ते ठाणो न्यायालयात हजर झाले. अॅड. मोकाशी यांनी सिंग यांचे अटक वारंट रद्द करण्याची मागणी न्यायालयाला केली. तेव्हा ठाणे पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करण्याच्या तसेच वैयक्तिक १५ हजारांचा जात मुचलका देण्याच्या आणि एक जामीन देण्याच्या अटीवर न्यायालयाने ते वॉरंट  रद्द केले. यावेळी वैयक्तिक जामीन देण्यासाठी दोन आठवडयांची मुदत परमबीर सिंग यांनी अॅड. मोकाशी यांच्या मार्फतीने मागितली. मात्र, न्यायालयाने जास्त मुदत न देता ३ डिसेंबपर्यंतत ही मुदत दिली. तसेच १५ हजारांचा वैयक्तिक जातमुचलकाही अॅड. मोकाशी यांनी दिला. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट न्या. तांबे यांनी रद्द केले. वैयक्तिक जातमुचलका देतांना सिंग यांचे आधारकार्डही तपासून घेण्याचे न्यायालयाने बजावले. तेंव्हा ते तपासल्याचे आरोपींच्या वकीलाने सांगितले. या सुनावणीच्या वेळी न्यायालयात वकीलांची मोठी गर्दी झाली होती. शिवाय, न्यायालयाच्या आवारातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

यापुढे तपासला पूर्ण सहकार्य करणार- राजेंद्र मोकाशी, परमबीर सिंग यांचे वकील 

आम्ही कोर्टाला सांगितले की, आरोग्य व्यवस्थित नसल्याने आम्ही उपस्थित राहू शकलो नाही,  आता यापूढे चौकशीला जेव्हा जेव्हा बोलावतील तेव्हा उपास्थित राहणार आहे.  पुढे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बोलावण्यात येईल, चांदीवाल आयोग समोर देखील आम्ही जाऊ, आता देखील चौकशी सुरू आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगthaneठाणेCourtन्यायालयMumbaiमुंबईArrestअटक