शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

म्यानमारमध्ये बंदिस्त केलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 08:34 IST

थायलंडमध्ये नोकरीच्या नावाने फसवणूक, एजंट विरोधात होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: थायलंड येथे नोकरीसाठी पाठवून तेथून म्यानमार देशात जबरदस्तीने पाठवून म्यानमारमध्ये छळ करत कामास जुंपलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका करून पोलिसांच्या भरोसा सेलने त्याला पुन्हा मायदेशी आणले आहे, तर परदेशात नोकरी देतो सांगून फसवणूक करणाऱ्या एजंटवर कारवाईसाठी पोलिसांनी तयारी चालवली आहे.

भाईंदरच्या उत्तन येथे राहणाऱ्या परवीन शेख यांनी भाईंदरच्या भरोसा सेलकडे तक्रार दिली होती. त्यांचा मुलगा शहजान (२५) याला ठाण्यातील एजंटने थायलंड येथे नोकरी देतो सांगून पैसे घेतले. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरला एजंटने शहजानला आधी चेन्नई विमानतळावर पाठवले. तेथून पर्यटक व्हिसाद्वारे थायलंडमध्ये नोकरीसाठी पाठवले, मात्र थायलंड येथे तो पोहोचल्यावर त्याला तेथे नोकरी न देता तेथून बेकायदेशीररीत्या लगतच्या म्यानमार देशात बळजबरीने पाठविण्यात आले. त्याचा मोबाइल काढून घेत म्यानमारमधील एका कंपनीत कॉलिंग करण्याचे काम दिले. दिलेले लक्ष्य पूर्ण केले नाही, तर त्याचा अमानुष छळ केला जात असे. २८ दिवसांनी त्याला मोबाइल अर्ध्या तासासाठी दिल्यावर त्याने आई परवीन हिला कॉल करून झालेली फसवणूक व केला जाणारा छळ आदींची माहिती दिली.

शहजान नेमका कुठे आहे याची माहिती होत नव्हती. त्याच्यासोबत कोणताही संपर्क होत नसल्यामुळे तो नक्की कुठे आहे व कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, याबाबत परवीन यांना कोणतीही माहिती नव्हती. भाईंदर भरोसा सेलच्या प्रमुख सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या निदर्शनास प्रकार आणून दिल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे, सेलचे सचिन तांबवे, आफ्रिन जुनैदी यांनी तपास सुरू केला. शिंदे यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शहजानची म्यानमार येथून सुटका केली. ३० मार्चला तो मायदेशी सुखरूप परतला.

नोंदणीकृत एजंट असल्याची खात्री करा

परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रोटेक्टर्स ऑफ इमिग्रंटसचे कार्यालय वांद्रे येथे आहे. परदेशात नोकरीसाठी पाठविणारे एजंट हे नोंदणीकृत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. परदेशात नोकरी देतो सांगून फसविणारे आणि पुशिंगच्या माध्यमातून अन्य देशात बेकायदा पाठवण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन भरोसा सेलच्या तेजश्री शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Myanmarम्यानमारThailandथायलंडmira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस