शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आकुर्डीतून 35 लाखांसाठी अपहरण झालेल्या मॅनेजरची सुटका; पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 02:51 IST

तीन वाहनांसह सात मोबाइल जप्त, खंडणीचे पैसे स्वीकारण्यासाठी आलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पिंपरी : गुंतवणुकीसाठी पैसे घेण्यासाठी मुंबई येथून आलेल्या व्यापा-याच्या मॅनेजरचे आकुर्डी येथून शनिवारी (दि. 10) अपहरण झाले. अपरहरणकर्त्यांनी 35 लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. तसेच आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली तीन वाहने व सात मोबाइल फोन असा 61 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायातून वाद होऊन हा अपहरणाचा प्रकार झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

राहूल तिवारी (वय 27, सध्या रा. आकुर्डी) असे सुटका झालेल्या अपह्रत मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी राजकुमार मनोहरसिंग (वय 43, रा. कांदिवली, मुंबई) यांनी मंगळवारी (दि. 13) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अमर कदम, शशांक कदम आणि हरिश राजवाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे मॅनेजर राहूल तिवारी यांच्यासह कामानिमित्त आकुर्डी येथे आले. काळेवाडीतील नाना काळे यांच्याकडून गुंतवणुकीसाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी मॅनेजर राहूल गेला. त्यांचा शनिवारी फिर्यादी राजकुमार यांना फोन आला. मी पाच लाख रुपये आणले आहेत, मात्र मला वाचवा, असे म्हणून त्यांनी फोन कट केला. राजकुमार यांनी राहूल यांच्या मोबाइलवर फोन केला असता तो राजकुमार यांच्या ओळखीच्या आरोपी अमर कदम याने उचलला. राहूलला सोडायचे असेल तर 35 लाख रुपये द्या, असे म्हणत खंडणी मागितली. त्यानंतर राजकुमार यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

खंडणीचे पैसे स्वीकारण्यासाठी आलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आशुतोष अशोक कदम (वय 28, रा. रहाटणी), राहुल बसवराज माळगे (वय 22, रा. काळेवाडी), हरिश्चंसद्र बारकू राजीवाडे (वय 40, रा. बापदेवनगर, किवळे), शशांक जगन्नाथ कदम (वय 39, रा. मोरवाडी, पिंपरी), तुळशीराम नथुराम पोकळे (वय 34, रा. नढेनगर, काळेवाडी) अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

अपह्रताला चारचाकी वाहनातून फिरवले दिवसभरआरोपी यांनी राहूल तिवारी यांचे अपहरण करून त्यांच्याकडील पाच लाख रुपये काढून घेऊन त्यांना चारचाकी वाहनातून दिवसभर फिरवले. दुस-या दिवशी गहुंजे येथे बिल्डिंगमध्ये रात्रभर डांबून बेल्टने मारहाण केली. दरम्यान, तुळशीराम नथुराम पोकळे, अमर अशोक कदम, विकी गरुड, उमेश मोरे यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आरोपी यांनी अपह्रत राहुल तिवारी यांना सोडून दिले.

टॅग्स :Arrestअटक