शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवकाचा लग्नास नकार; युवतीनं घेतला टोकाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 20:36 IST

मुरादाबाद इथं भाड्याने घेतलेल्या खोलीत २ दिवसांपूर्वी २४ वर्षीय मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला

मुरादाबाद - उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद इथे युवकानं लग्नास नकार दिल्यामुळे मुलीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. युवकाचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरलं होतं. त्यामुळे युवती मानसिक तणावाखाली असल्याने तिने टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबाद इथं भाड्याने घेतलेल्या खोलीत २ दिवसांपूर्वी २४ वर्षीय मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. शेजाऱ्यांनी दुर्गंध येऊ लागल्याने पोलिसांना कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा उघडताच समोर त्यांना हे दृश्य दिसले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. त्यात मुलीचा मृत्यू २ दिवसांपूर्वी झाल्याचं समोर आले. 

मुलीच्या नातेवाईकांची केली चौकशीया प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना बोलावलं. त्यांनी एका मुलावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी मुलीच्या मोबाईल आधारे तारेश नावाच्या युवकाला ताब्यात घेतले. तपासात कळालं की, तारेश आणि मृत मुलगी दोघेही खूप दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मुलगी कॅम्प्युटर कोर्स केला होता. मुलगी आणि युवकामध्ये लग्नावरून वाद सुरू होता. युवक मुलीपासून वेगळा झाला होता. तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार होता. त्यामुळे मुलगी त्रस्त होती. त्यातून तिने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. याबाबत पोलीस अधिकारी हेमराज मीना यांनी म्हटलं की, तारेशचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत ठरलं होते. लग्नावरून दोघांमध्ये वाद सुरू होते. मृत मुलीला तारेशची लग्न करायचं होते. त्यावरून ती मानसिक तणावाखाली होते. दोघांमध्ये वाद असल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं. सध्या आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. 

हा युवक मुलीच्या शेजारी राहायचा. अनेक दिवसांपासून ते संपर्कात होते. आरोपी युवक अनेक खासगी उद्योग करायचा. मुलीच्या भावाने सांगितले की, माझी बहीण कॉम्प्युटर कोर्स करायची. ३ दिवसांपासून तिला कॉल करत होतो पण ती फोन उचलत नव्हती. जेव्हा चौथ्या दिवशी कॉल उचलला नाही. तेव्हा ती कुठे राहतेय हे जाणून घेतले. ती १ महिन्यापासून वेगळी राहत होती. पोलीस सर्व अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"