शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा

By जितेंद्र कालेकर | Updated: June 2, 2025 20:48 IST

नेव्हल डाॅकमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ अभियंता म्हणून काम करणाऱ्या रवीला महिला पीआयओने हनी ट्रॅपमध्ये अडकविल्यानंतर त्याने भारतातील १४ पाणबुडया आणि वेगवेगळया युद्धनाैकांची नावासह माहिती त्यांना दिल्याचा आराेप आहे.

जितेंद्र कालेकर 

ठाणे: भारतीय नाैदलातील गाेपनीय माहिती पाकिस्तानी इन्टेलिजन्स ऑपरेटीव्ह (पीआयओ) ला देणाऱ्या कळव्यातील रवी वर्मा याच्या पाेलीस काेठडीत ५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याच्या काेठडीची मुदत साेमवारी संपल्यानंतर त्याच्या वाढीव काेठडीची मागणी दहशतवाद विराेधी पथकाने (एटीएस) केल्यानंतर त्याच्या काेठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.

नेव्हल डाॅकमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ अभियंता म्हणून काम करणाऱ्या रवीला महिला पीआयओने हनी ट्रॅपमध्ये अडकविल्यानंतर त्याने भारतातील १४ पाणबुडया आणि वेगवेगळया युद्धनाैकांची नावासह माहिती त्यांना दिल्याचा आराेप आहे. या पाणबुडया आणि युद्धनाैकांचे नेमके लाेकेशन सांगून काेणती नाैका काेणत्या ठिकाणी उभी आहे, याची माहितीही दिली. वर्माला एटीएसने २९ मे २०२५ राेजी पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत भारतीय नाैदलाची संवेदनशील माहितीपुरविल्याप्रकरणी अटक केली. ताे पाकिस्तानच्या पायल शर्मा आणि इस्प्रीत या दोन वेगवेगळया नावांनी चालविण्यात येत असलेल्या फेसबुक फ्रेंडच्या संपर्कात हाेता.

दरम्यान, त्याने काेणत्याही संवेदनशील बाबींची माहिती पाकला पुरविली नसून संबंधित माहिती गूगलवरही उपलब्ध असल्याचा दावा त्याच्या वकीलांनी केला. त्याच्याकडे मिळालेल्या निळया डायरीमध्येही काेणतीही विशेष माहिती नसून त्यात दाेन पानांव्यतिरिक्त काही नाही. काेणाचे नावही नाही. त्यात केवळ आजचे काम काय? आणि उद्याचे काम काय? अशी राेजनिशी आहे. त्याने युद्धनाैकांसह आणखीही काेणती माहिती पाकच्या हेरगिरी करणाऱ्या पीआयओंना दिली, याचा आणखी खुलासा हाेणे बाकी असल्याने त्याच्या काेठडीत वाढ करण्याची मागणी एटीएसने न्यायालयात केली. त्याच आधारे त्याच्या काेठडीत वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान