पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात एका कंपनीच्या केक डिलिव्हरी बॉयनं ब्लॅकमेल करून ६६ महिलांना आपलं शिकार बनवलं आहे. महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हुगळीतील सीरियल रेप केसमध्ये हा खळबळजनक खुलासा झाला आहे. या डिलिव्हरी बॉयनं ज्या महिलांना आपलं शिकार बनवलं आहे. त्यातील एका महिलेनं आपल्या वेदना मांडल्या आहेत.
गेल्या काही दिवसात ही खळबळजनक घटना समोर आली आहे. हुगळीतील डिलिव्हरी बॉयद्वारे महिलांना फीडबॅकच्या नावावर ब्लॅकमेल करण्याच्या घटनांचं मुळ शोधून काढण्यात आलं आहे. या महिलांना सुरूवातीला आरोपीकडून खूप मेसेजेस आणि कॉल्स येत होते.
बलात्काराची शिकार झालेल्या महिलेनं सांगितले की, ''या महिन्यात १८ तारखेला आरोपीनं वॉट्सअॅपच्या माध्यमातून अश्लिल मेसेजेस पाठवायला सुरूवात केली. माझ्यासह शरीरसंबंध ठेवले नाही तर व्हिडीओ रेकॉर्ड करून व्हायरल करेन अशी धमकीसुद्धा दिली.''
आरोपीनं फिडबॅकच्या नावावर या महिलेला ब्लॅकमेल केलं होतं. व्हिडीओ कॉलवर बोलताना आपल्या फोनमध्ये काही फोटो कैद केले होते. इतकंच नाही तर पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार त्यानं तिच्यासह दुष्कर्मसुद्धा केले. तसंच सोन्याची रिंग आणि दागिनेसुद्धा नाही दिले तर सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करेन अशी धमकी दिली होती. Miracle puppy : पहिल्यांच समोर आला ६ पाय अन् २ शेपट्यांचा कुत्रा; अशा अवस्थेत जीवंत राहणारा जगातला पहिला जीव
पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार विशाल वर्मा आणि त्याचा मित्र सुमन मंडल यानेही तिचे शोषण केले याशिवाय बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी विशाल वर्मा आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. अटक करून ५ दिवसांनी पोलिसांनी या आरोपींना रिमांडमध्ये घेतले आहे. या प्रकरणावर पोलिसांची विचारपूस सुरू असून पोलिस लवकरच या केसचं रहस्य उलगडणार आहेत. बापरे! मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली गरोदर शार्क; पोट फाडल्यानंतर जे बाहेर आलं ते पाहून बसला धक्का