शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडितेनेच रचला स्वत:वर हल्ल्याचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 03:22 IST

पोलिसांची उच्च न्यायालयाला माहिती; बलात्कार, धमकी प्रकरणी करण ओबेरॉयची जामिनावर सुटका

मुंबई : टीव्ही अभिनेता आणि गायक करण ओबेरॉय याचा जामीन मंजूर होऊ नये, यासाठी बलात्कार पीडितेनेच स्वत:वर हल्ला केल्याची माहिती शुक्रवारी सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली. याबाबत पोलिसांनी केलेल्या तपासाचा आधार घेत न्यायालयाने करण ओबेरॉय याचा जामीन अर्ज मंजूर करत त्याला मोठा दिलासा दिला.

एका महिला ज्योतिषाने करणविरोधात बलात्काराची तक्रार केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी त्याला ५ मे रोजी अटक केली. तक्रारीनुसार, करणने विवाहाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पैशांची मागणी केली.

मात्र, तक्रारदाराने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा करणच्या वकिलांनी न्यायालयात केला. ‘एकमेकांच्या सहमतीनेच आमच्यात शारीरिक संबंध होते. तक्रारदाराशी नाते तोडल्यानंतरच तिने बलात्काराचा आरोप करण्यास सुरुवात केली,’ असे करणच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी तक्रारदारावर झालेल्या हल्ल्याची माहिती न्यायालयाला देताना सांगितले की, तक्रारदाराने स्वत:वरच हल्ला करण्याचा कट रचला आणि अंमलात आणला आणि हा हल्ला आरोपीने केल्याचा आरडाओरडा केला.न्यायालयाने हे सर्व विचारात घेत करण ओबेरॉयची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली.

‘तक्रारदाराने स्वत:वरच हल्ला करून असे दाखविण्याचा प्रयत्न केला की, तिने आरोपीविरोधात तक्रार केल्यामुळे तिला ‘लक्ष्य’ करण्यात येत आहे. आरोपीची जामिनावर सुटका होऊ नये, यासाठी तिने स्वत:वरच हल्ला केला. तक्रारदाराला आरोपीशी विवाह करायचा होता. मात्र, त्याने विवाह करण्यास नकार देऊन तिला टाळण्यास सुरुवात केली,’ असे निरीक्षण न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी ओबेरॉयचा जामीन अर्ज मंजूर करताना नोंदविले. तक्रारदार आणि ओबेरॉय यांच्यात झालेल्या संदेशाच्या देवाणघेवाणीवरून हेच लक्षात येते की, तक्रारदाराने स्वत:हून आरोपीसाठी गिफ्ट विकत घेतले. त्याने गिफ्टची मागणी केलीच नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

पोलिसांना धरले धारेवरन्यायालयाने या प्रकरणाच्या तपासावरून पोलिसांना धारेवर धरले. ‘ज्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास करण्यात आला, त्यावर खूप काही बोलण्यासारखे आहे. पोलिसांनी तक्रारदाराचा मोबाइल अद्याप जप्त केला नाही. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणाने केला जाईल, अशी आशा मला वाटते,’ असे न्यायालयाने म्हटले.

यापूर्वी सत्र न्यायालयाने करण ओबेरॉय याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. त्यामुळे ओबेरॉयने सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

टॅग्स :Rapeबलात्कार