शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दोन लहान मुलींवर बलात्कार, दोषीला मृत्यूपर्यंत जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 03:44 IST

दाबी (जिल्हा कोटा) गावात २०१९ मध्ये पाच आणि सहा वर्षांच्या मुलींवर बलात्कार केल्याच्या खटल्यात बुंदी येथील पोक्सो (लहान मुलांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा) न्यायालयाने हिरालाल खाटी (वय २७) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

कोटा (राजस्थान) : दाबी (जिल्हा कोटा) गावात २०१९ मध्ये पाच आणि सहा वर्षांच्या मुलींवर बलात्कार केल्याच्या खटल्यात बुंदी येथील पोक्सो (लहान मुलांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा) न्यायालयाने हिरालाल खाटी (वय २७) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.खाटी हा चित्तोडगढ जिल्ह्यातील रहिवासी असून, त्याला पोक्सो न्यायालयाने (क्रमांक दोन) जन्मठेपेची शिक्षा सुनावली, अशी माहिती सरकारी वकील महावीर मेघवाल यांनी दिली.४ जुलै, २०१९ रोजी दोन अल्पवयीन मुलींच्या वडिलांनी दाबी पोलीस ठाण्यात खाटीविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. खाटी हा या मुलींच्या वडिलांच्या घरी भाडेकरू होता. पाच आणि सहा वर्षांच्या मुली त्यांचे वडील कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना घरी खेळत होत्या. खाटी याने त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवून स्वत:च्या खोलीत नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला, असे मेघवाल म्हणाले.खाटीविरुद्ध पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला लगेचच अटक झाली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश अरुण कुमार यांनी खाटी याला बुधवारी दोषी ठरवून त्याला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्याच्या सुनावणीत १३ जणांची साक्ष नोंदविली गेली आणि किमान २० दस्तावेज सादर केले गेले होते, असे मेघवाल म्हणाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय