शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराच्या बहाण्याने माहीम दर्गाच्या विश्वस्ताकडून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 21:53 IST

Rape : विवाहितेचा आरोप, माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देकाही महिन्याने दोघांच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेही तलाक दिल्यामुळे विवाहितेने पोलिसांत धाव घेतली. 

मुंबई  - उपचाराच्या बहाण्याने वक्फ बोर्ड महाराष्ट्राचे सदस्य आणि माहीम दर्गाचे विश्वस्त डॉ. मुदासीर लांबेने बलात्कार केल्याचा आरोप ३३ वर्षीय विवाहितेने केला आहे. पुढे याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला धमकावले. काही महिन्याने दोघांच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेही तलाक दिल्यामुळे विवाहितेने पोलिसांत धाव घेतली. याच आरोपावरून शुक्रवारी माहीम पोलिसांनी लांबे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

 तक्रारदार या माहीम परिसरात राहण्यास असून टेली कॉलिंग कंपनीत कामाला आहे. विवाहितेने केलेल्या आरोपानुसार, गेल्या वर्षी ११ जानेवारी रोजी एका कार्यक्रमात लांबेंंसोबत ओळख झाली. लांबेनी समाजसेवा संबंधित कामानिमित्त भेटण्यास सांगितले. दोन-तीन वेळा कामानिमित्त भेटी झाल्या. पोटाच्या आजाराबाबत लांबे यांना सांगताच, त्यांनी २८ जानेवारी रोजी सर्व रिपोर्ट घेऊन क्लिनिकमध्ये बोलवले. त्यानुसार क्लिनिकमध्ये गेल्यानंतर कमरेला इंजेक्शन देत डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. पुढे याबाबत पोलिसांत जाण्याचे सांगताच, याचे व्हिडीओ पतीला पाठवून दोघांमध्ये संबंध असल्याची धमकी तिला दिली. तसेच पोलिसांसह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबतही संबंध असल्याने आपल्याविरोधात काही करणे शक्य नसल्याचे सांगितल्याने, घाबरून तिने याबाबत कुणाला सांगितले नाही. त्यानंतर वारंवार कॉल करून तिला बोलावून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 

अशात ऑगस्ट महिन्यात दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने तलाक दिला. तिने याबाबत लांबेला सांगताच त्याने लग्न करण्याचे आमीष दाखवले. पुढे तो पत्नीच्या गुप्तरोगासाठी बाहेर असल्याचे सांगून तिला टाळू लागला. तिच्याशी बोलणेही बंद केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. पुढे, लांबेने काहीही न केल्याचा आव आणत तिलाच धमकाविणे सुरु केले. अखेर, तिने वकीलाकडे धाव घेत घड़लेला प्रकार सांगितला. त्यांच्या सल्ल्याने पोलिसांत तक्रार दिली. गेल्या महिन्यात ७ डिसेबर रोजी त्यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिला. २० तारखेला जबाब नोंद झाल्यानंतर शुक्रवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी क़ाय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

सोमवारी बैठक

माहीम दर्गा मानवतेचे व्यासपीठ आहे. या घटनेबाबत विश्वस्त मंडळ सोमवारी बैठक घेऊन पुढील कारवाईचा निर्णय घेतील.

सोहेल खंडवाणी, व्यवस्थापकीय विश्वस्त, माहीम दर्गा  

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसMumbaiमुंबई