शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Rape Case: महाराष्ट्रात खो खो खेळलेल्या खेळाडूवर बिजनौरमध्ये बलात्कार; रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 14:28 IST

Rape on Kho Kho National Player in Uttar Pradesh: बिजनौरची ही 24 वर्षीय खेळाडू शुक्रवारी दुपारी आपल्या घरातू एका कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूसाठी निघाली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचली नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली.

मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्काराची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशमध्ये देखील एका राष्ट्रीय स्तरावरील खोखो खेळाडूवर बलात्काराची घटना घडली आहे. बिजनौर रेल्वे स्थानकावजळ रेल्वे ट्रॅकवर तिचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंद केला असून तपास सुरु केला आहे. (Rape on National Kho Kho player in Bijnor, murder.)

बिजनौरची ही 24 वर्षीय खेळाडू शुक्रवारी दुपारी आपल्या घरातू एका कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूसाठी निघाली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचली नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. तेवढ्यात एका शेजारच्या महिलेने रेल्वे ट्रॅकवर एक रक्ताच्या थारोळ्यात तरुणीचा मृतदेह पडलेला सापडल्याचे सांगितले. यामुळे घरच्यांनी पोलिसांना खबर दिली. काही तासांनी तिची ओळख पटली. 

तिच्या घऱच्यांना समजण्याआधीच पोलीस तिथे पोहोचले होते. घरापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनच्या गोदामाच्या मागे तिचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मुलीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या शरीरावरील घाव पाहून असे दिसते की तिच्यावर बळजबरी करण्यात आली. तिच्या गळ्यात ओढणी आवळलेली होती. तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे दिसून येते. तिच्या शरीरावर जखमादेखील होत्या. तिचा एक दातही तुटला आहे. नाकातून रक्त येत होते, असे तिच्या बहीणीने सांगितले. 

मृत खेळाडू ही २०१६ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या खो-खो स्पर्धेत खेळली होती. तसेच युनिव्हर्सिटीमध्ये देखील तीने स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा कोणी नोंदवायचा यावरून रेल्वे पोलीस आणि राज्याचे पोलीस यांच्यात वाद होत होता. अखेर राज्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. रेल्वे स्टेशन भागातील नशेबाज लोकांवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश