शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाकडून तरुणीचा विनयभंग, सानपाडा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 09:23 IST

सानपाडा येथे शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. सानपाडा येथे राहणारी तरुणी तिच्या मित्रासह परिसरातून चालली होती.

नवी मुंबई : रात्रीच्यावेळी चौकशीच्या बहाण्याने तरुणीला अडवून पोलिसानेच तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पवईच्या आयआयटीमध्ये शिकणारी ही तरुणी आहे. दरम्यान, सानपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्यानंतर तरुणीने पवई पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. अखेर संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सानपाडा येथे शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. सानपाडा येथे राहणारी तरुणी तिच्या मित्रासह परिसरातून चालली होती. यावेळी सानपाडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी दीपक राठोड याने चौकशीच्या बहाण्याने त्यांना थांबवले. त्यानंतर तरुणीकडे मोबाइल नंबर मागून तिने तो देण्यास नकार दिल्यानंतर तिच्यासोबत गैरकृत्य केले. यामुळे संतप्त तरुणी तक्रार करण्यासाठी सानपाडा पोलिस ठाण्यात आली असता तिची दखल घेतली नाही. यामुळे तिने संपूर्ण प्रकार आयआयटीमधील वरिष्ठांना कळवला होता. त्यांनी पवई पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करून तो सानपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार राठोड याला अटक करण्यात आली असून तो पोलिस वाहनचालक आहे. त्याच्या या कृत्याची दखल घेत त्याचे निलंबन करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी