बारामती: अल्पवयीन मुलीवर लॉक डाऊनच्या काळात शाळेच्या स्वच्छतागृहामध्येच बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात संबंधित मुलीने तक्रार दिली आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश खुडे ( रा. वडगाव निंबाळकर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याने लग्नाचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर दोन महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी खुडे याच्यावर बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल ते मे २०२० या कालावधीत वडगाव निंबाळकर येथील शाळेच्या स्वच्छतागृहासह विविध ठिकाणी अनेकवेळा बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी ही माहिती दिली.--------------------------------------------------------------------------------------------
धक्कादायक ! लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बारामती तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 02:10 IST
आरोपीला अद्याप अटक नाही...
धक्कादायक ! लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बारामती तालुक्यातील घटना
ठळक मुद्देयाप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात संबंधित मुलीची तक्रार