शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पतीने केला असेल तरी बलात्कार हा बलात्कारच; गुजरात कोर्टाने महिलेचा जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 05:59 IST

समाजात पाठलाग करणे, विनयभंग, शाब्दिक आणि शारीरिक हल्ल्यांना किरकोळ गुन्हे म्हणून चित्रित केले जाते आणि सिनेमासारख्या लोकप्रिय माध्यमातही त्याचा प्रचार केला जातो.

अहमदाबाद : बलात्कार हा बलात्कारच असतो, भले तो पुरुषाने पत्नीविरुद्ध केला असेल. महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत मौन तोडण्याची गरज असल्याचे गुजरात हायकोर्टाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती दिव्येश जोशी यांनी आदेशात म्हटले की, महिलांवरील हिंसाचाराच्या घटना नोंदवलेल्या आकडेवारीपेक्षा जास्त आहेत. समाजात पाठलाग करणे, विनयभंग, शाब्दिक आणि शारीरिक हल्ल्यांना किरकोळ गुन्हे म्हणून चित्रित केले जाते आणि सिनेमासारख्या लोकप्रिय माध्यमातही त्याचा प्रचार केला जातो.

लैंगिक गुन्ह्यांकडे ‘मुले ही मुलेच राहतात’ या दृष्टिकोनातून पाहिले जाते आणि गुन्ह्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचा  पीडितांवर  कायमस्वरूपी परिणाम होतो, असे कोर्टाने म्हटले आहे. सुनेवर क्रौर्य केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका महिलेचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली.

पैसे कमविण्याच्या लालसेपोटी महिलेचा पती आणि मुलाने सुनेवर बलात्कार केला आणि तिचा विवस्त्र अवस्थेत व्हिडीओ बनवून पॉर्न साइटवर पोस्ट केले, असा आरोप आहे.

हे मौन तोडा...कोर्टाने म्हटले आहे की, हे मौन तोडले पाहिजे. असे करताना, महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी महिलांच्या तुलनेत पुरुषांचे कर्तव्य आणि भूमिका अधिक ठाम असणे आवश्यक आहे. अनेक देशांत वैवाहिक बलात्कार बेकायदेशीर आहे.

आईला होती जाणीव... कुटुंबाला हॉटेलची विक्री रोखण्यासाठी पैशांची गरज होती. यामुळे मुलाने मोबाइलवर संबंधांचे नग्न व्हिडिओ बनवले आणि ते आपल्या वडिलांना पाठविले. मुलाच्या आईला याची पूर्ण कल्पना होती कारण तिच्या उपस्थितीत हे कृत्य घडले होते. पीडिता एकटी असताना सासऱ्यानेही तिचा विनयभंग केला. सासूला या बेकायदा आणि लज्जास्पद कृत्याची जाणीव होती आणि तिने पती आणि मुलाला असे कृत्य करण्यापासून रोखले नाही, तिने गुन्ह्यात समान भूमिका बजावली, असे न्यायालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग