शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

माहेरी आलेल्या महिलेवर घरात घुसून अत्याचार; पाठलाग करत आलेला सासरवाडीतील दुकानदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 18:51 IST

सासरवाडीतल्या दुकानदाराने महिलेच्या माहेरात घुसून केला अत्याचार

ठळक मुद्देपाठलाग करत दुकानदार पोहचला महिलेच्या माहेरीसंधीसाधून घरात घुसून केला अत्याचार

अंबाजोगाई : परभणी जिल्ह्यातील महिला अंबाजोगाईत माहेरी आली होती. तिच्या पाठोपाठ आलेल्या सासरवाडीतील किराणा दुकानदाराने माहेरच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवारी (दि.७) रात्री घडली. त्या दुकानदारावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.  याप्रकरणी २५ वर्षीय पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तिचे सासर परभणी जिल्ह्यात देऊळगाव (ता. पूर्णा) हे आहे. तर, सचिन निळकंठ दुधाटे (वय २२) याचेही  देऊळगाव येथे किराणा दुकान आहे. सोमवारी पीडिता तिच्या तीन मुलांना घेऊन माहेरी अंबाजोगाई येथे आली होती. माहेरी तिची वयोवृद्ध आई असून त्यांची दृष्टी कमी झालेली आहे. सर्व कुटुंबीय जेवण करून झोपी गेल्यानंतर पीडिता रात्री ११ वाजता घराबाहेर बसली होती. त्यावेळी तिला सचिन दुधाटे समोर दिसल्याने पिडीतेने त्याची विचारपूस केली.

बोलण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या सचिनला पिडीतेची अंध आई आणि तिन्ही मुलं झोपल्याचे लक्षात आले. त्यानंतर तो बळेच घरात घुसला आणि पिडीतेवर अत्याचार केला. आरडाओरडा केला तर आजूबाजूचे लोक गोळा होतील आणि बदनामी होईल या भीतीने पीडिता शांत राहिली. झालेल्या घटनेबाबत कुठे वाच्यता केल्यास तुझ्यासह नातेवाईकांना जीवे मारील अशी धमकी देऊन सचिन तिथून निघून गेला. त्यानंतर भाऊ आणि इतर नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर पिडीतेने बुधवारी (दि.९) अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून सचिन दुधाटे याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पीएसआय सुचिता शिंगाडे करत आहेत. सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दरम्यान, गुन्हा नोंद होताच पोलिसांनी सचिनला अंबाजोगाईतील सदर बाजारातून ताब्यात घेतले. गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास सोमवार (दि.१४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :Rapeबलात्कारBeedबीडCrime Newsगुन्हेगारी