शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अत्याचार; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:11 IST

दहावर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणात संबंधित आरोपीला खामगाव येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : एका दहा वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणात संबंधित आरोपीला खामगाव येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने हा महत्वूपर्ण निकाल सोमवारी सकाळी दिला.खामगाव तालुक्यातील एका गावातील पिडित बालिकेच्या आईचे निधन झाले. दरम्यान वडीलही सोडून गेल्याने ती भावंडांसोबत राहत होती. २२ डिसेंबर २०१६ रोजी स्थानिक इंदिरा नगर भागातील रामा विठ्ठल नंदनवार याने तिला दहा रूपयांची नोट दाखवित, बोरं आणायला सोबत येण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला गावाजवळील एका निर्जनस्थळी नेले. तेथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला. कोणला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, आरोपीने पोबारा केला. घरी परतल्यावर भेदरलेल्या पिडीतेने कुणालाही याबाबत सांगितले नाही. भावाने विचारले असता पोटात दुखते असे सांगून ती झोपुन राहिली. दुसऱ्या दिवशी शेजारी महिलेस तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर २५ डिसेंबर २०१६ रोजी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर यांनी या प्रकरणाचा तपास करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. न्यायालयाने या प्रकरणात अकरा साक्षीदार तपासले.दोष सिध्द झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.डी. देशपांडे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. रजनी बावस्कर-भालेराव यांनी काम पाहिले. पिडीतेस शासनाकडून पुर्नविस्थापनासाठी योग्य ती मदत मिळावी, यासाठी जिल्हा विधी समितीकडे न्यायालयाने शिफारस केली.अशी ठोठावली शिक्षा!अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा कलम ३,२,५ आजीवन सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, हा दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा. कलम ३,१ ह अन्वये सहा महिने कारावास व ५०० रुपये दंड हा दंड, न भरल्यास १ महिना कारावास कलम ३७६ (२) (आय) व कलम ६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये प्रत्येकी दहा वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्याने दोन महिने शिक्षा, याप्रमाणे शिक्षा सुनावली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीkhamgaonखामगाव