शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या गुन्ह्यातील १ वर्षापासून फरार आरोपीला अटक; गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 18:05 IST

आरोपी अतुल यादव याने पीडित महिलेला त्याच्या मैत्रिणीस भेटण्याकरीता नेण्याचा बहाणा करुन मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बाफाणे येथील एका हॉटेलमध्ये नेले.

मंगेश कराळे

लोकमत न्यूज नेटवर्क,

नालासोपारा  :- नायगांव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या आरोपीला एका वर्षांनंतर अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी रविवारी दिली आहे.

आरोपी अतुल यादव याने पीडित महिलेला त्याच्या मैत्रिणीस भेटण्याकरीता नेण्याचा बहाणा करुन मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बाफाणे येथील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे नेल्यानंतर आरोपीने पिडीत महिलेला कोणते तरी गुंगीकारक पदार्थ मिश्रीत ज्युस पाजून त्यांच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने शरीर संभोग करुन त्याचा व्हिडीओ बनविला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल वेबसाईटवर व्हायरल करण्याची धमकी देत जून २०२२ से ११ सप्टेंबर २०२३ पर्यंत पिडीत महिलेसोबत बाफाणे परिसरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तसेच दहीसर  येथील हॉटेलमध्ये नेवून जबरदस्तीने शारीरिक संभोग करून बलात्कार केला होता. १४ सप्टेंबरला नायगांव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. 

गेल्या १ वर्षापासून उघडकीस न आलेल्या गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपास चालू करण्यात आला. गुन्ह्याच्या समांतर तपासा दरम्यान आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नसल्याने त्याच्या शोधासाठी उपयुक्त माहीती प्राप्त करण्याचे अनुषंगाने गुन्हयाचे घटनास्थळातील हॉटेलमधील साक्षीदार व्यक्तींकडून आरोपीची माहीती प्राप्त केली. आरोपीचे उपलब्ध अपूर्ण नाव,  पत्याचे आधारे निरंतर सातत्याने तपास करत मिळालेल्या बातमीदाराकडून आरोपीचा मोबाईल नंबर प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषणातून ठावठिकाणा निष्पन्न केला. आरोपी अतुलकुमार जयप्रकाश यादव (२५) याला सायनच्या अँटॉपहील चर्चजवळून शिताफीने ताब्यात घेतले.

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली  गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकूर, अमोल कोरे, मसुब रामेश्वर केकान, अविनाश चौधरी आणि सायबरचे संतोष चव्हाण यांनी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी