शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

Amit Mishra : भयंकर! क्रिकेटपटू अमित मिश्राच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला; आई-वडीलांसह पत्नी, मुलांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 09:41 IST

Cricket player Amit Mishra : क्रिकेटपटू अमित मिश्रा याच्या घरामध्ये घुसून कुटुंबावरच हल्ला करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - छत्तीसगडमधील बिलासपूरमधील धुमा येथे एका किरकोळ वादावरुन धक्कादायक घटना घडली आहे. रणजी क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणारा क्रिकेटपटू अमित मिश्रा (Cricket player Amit Mishra) याच्या घरामध्ये घुसून कुटुंबावरच हल्ला करण्यात आला आहे. अमित याच्या घरा शेजारी राहणाऱ्या तरुणांनी रॉड, फावडे आणि लाठ्या-काठ्यांनी अमित मिश्राचे आई-वडील, छोटा भाऊ, गर्भवती वहिनी, लहान पुतण्यांबरोबर पत्नी आणि मुलांनाही मारहाण केली. अनेकजण गंभीर जखमी असून त्यांना अपोलो रुग्णालयामध्ये तसेच सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

सरकंडा पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकंडा येथील कृष्णा विहार कॉलिनीमधील निवासी असणारे रणजीपटू अमित मिश्रा यांचे शेजरी गंगाधर मिश्रा हे त्यांच्या घराची डागडुजी करत आहेत. सोमवारी सकाळी गंगाधर मिश्रा आणि अमित मिश्राचे वडील चंद्रिका प्रसाद यांच्यात वाद झाला. गंगाधर यांनी चंद्रिका यांना तुमच्या घराच्या बाजूने असणाऱ्या भागामध्ये थोडी डागडुजी करायची आहे असं सांगितलं. त्यावर चंद्रिका यांनी आमची सकाळची पूजा आणि घरातील कामं झाल्यानंतर काम सुरू करा असं सांगितलं.

घरातील सदस्यांना बेदम मारहाण 

घराचं काम नंतर सुरू करा असं सांगितल्यामुळे गंगाधर मिश्रा प्रचंड संतापले असा आरोप करण्यात आला आहे. तसेच गंगाधर यांच्यासह त्यांचा भाऊ, दोन मुलं आणि अन्य व्यक्ती अचानक चंद्रिका मिश्रा यांच्या घरात घुसले आणि कुटुंबियांना बेदम मारहाण केली. यामध्ये चंद्रिका यांच्याबरोबरच शशी, प्रतिमा, हितेश, मंजू, अलका हे घरातील सदस्यही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.  त्यांना उपचारांसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

जीवघेण्या हल्ल्यात गर्भवती महिलेसह कुटुंबातील सदस्य जखमी 

सोमवारी जेव्हा अमित मिश्राच्या घरावर शेजाऱ्यांनी हल्ला केला तेव्हा तो अहमदाबादमध्ये सुरू असणाऱ्या क्रिकेट कॅम्पमध्ये सराव करत होता. नातेवाईकांनी फोन करुन त्याला धक्कादायक घटनेची माहिती दिली. याबाबत समजताच अमित बिलासपूरला रवाना झाला. या जीवघेण्या हल्ल्यात गर्भवती महिलेसह कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. कुटुंबातील नातेवाईकांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड