शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये सापडला खजिना; ४०० किलो चांदी; ७७२ किलोंचे दागिने; घबाड पाहून पोलीस चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 18:14 IST

बसमध्ये पार्सलचे बॉक्स सापडले; घबाड पाहून पोलिसांना बसला धक्का

उदयपूर: अहमदाबादकडून येणाऱ्या एका बसमध्ये पोलिसांना घबाड सापडलं आहे. उदयपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बसमध्ये आढळून आलेल्या १०५ पार्सलमध्ये चांदीचे ब्लॉक्स सापडले. त्यांचं वजन ४ क्विंटल ५० किलो भरलं. त्याशिवाय चांदीचे दागिनेदेखील आढळून आले. त्यांचं वजन ७ क्विंटल ७२ किलो होतं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

बलिचा बायपासजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी एका बसमध्ये अनेक पार्सल्स आढळून आल्याची माहिती गोवर्धन विलास ठाण्याचे प्रभारी असलेल्या चैल सिंह यांनी दिली. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी अहमदाबादकडून येणारी श्रीनाथ ट्रॅव्हल्सची बस रोखली. बसमध्ये पार्सल्सचे बॉक्स मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानं पोलिसांना संशय आला. त्यांनी सगळे बॉक्स उघडायला लावले. त्यात चांदीचे ब्लॉक्स आढळून आले.

याबद्दल पोलिसांनी बस चालकाकडे विचारणा केली. मात्र त्याला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यानंतर पोलिसांनी बस ताब्यात घेतली. ती पोलीस ठाण्यात नेली. अहमदाबादमध्ये सर्व पार्सल्स ठेवले गेल्याची माहिती चालकानं दिली. पार्सल्स उदयपूर, नाथद्वारा आणि अन्य ठिकाणी पोहचते करायचे होते. मात्र त्या बॉक्सच्या आत काय होतं, याची माहिती मला नव्हती, असं चालकानं जबाबात सांगितलं.