शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वडील त्रासले होते, त्यांना देवाकडे पाठवलं! खुनी मुलाचा जबाब ऐकून पोलीस हादरले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 12:53 IST

झोपेत असलेल्या वडिलांची मुलाकडून हत्या; डोक्यात काठी घालून वडिलांना संपवलं

जयपूर: राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात खंडार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलानं डोक्यात काठी घालून वडिलांची हत्या केली आहे. वडिलांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. वडिलांच्या हत्या करणाऱ्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस चौकशीत मुलानं हत्येची कबुली दिली. 

वडिलांची हत्या करण्यामागचं कारण पोलिसांनी चौकशी दरम्यान मुलाला विचारलं. त्यावर अब्बा त्रासले होते. त्यामुळे त्यांना जन्नतमध्ये पाठवलं, असं उत्तर आरोपी मुलानं दिलं. सध्या पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव इब्राहिम खान असून आरोपी मुलाचं नाव कुतुबुद्दीन आहे.

शुक्रवारी दुपारी २.३० वाजता इब्राहिम घरात झोपले होते. त्यांचा मोठा मुलगा अमीमुद्दीन कामासाठी बाहेर गेला होता. तर लहान मुलगा कुतुबुद्दीन घरीच होता. त्यानं झोपलेल्या इब्राहिम यांच्यावर काठीनं हल्ला केला. त्यानंतर इब्राहिम यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. वेदनेनं विव्हळत असलेले इब्राहिम थोड्याच वेळात बेशुद्ध पडले. इब्राहिम यांचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यावेळी कुतुबुद्दीन वडिलांच्या बाजूला बसून होता.

वडिलांना का मारलं असा प्रश्न शेजाऱ्यांनी विचारला. त्यावर वडील अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांना जन्नतमध्ये पाठवल्याचं कुतुबुद्दीननं सांगितलं. शेजाऱ्यांनी घटनेची माहिती अमीनुद्दीनला दिली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इब्राहिम यांना माधोपूर सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना जयपूरला रेफर करण्यात आलं. रुग्णालयात नेत असताना त्यांनी प्राण सोडला. त्यानंतर पोलिसांनी कुतुबुद्दीनला अटक केली.