शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

डुप्लिकेट सिमद्वारे ग्राहकाचे 27.5 लाख रुपये उडाले; Vodafone Idea भरपाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 8:58 AM

Vodafone Idea: कंपनीच्या माहितीशिवाय डुप्लिकेट सिम बनविता येत नाही. यामुळे एका ग्राहकाचे 27.5 लाख रुपये हॅकरने हडप केले. जर व्होडाफोनने य़ा ग्राहकाचा त्याचे पैसे एक महिन्याच्या आत दिले नाहीत तर त्यावर 10 टक्क्यांचे व्याज आकारले जाईल असे आदेशात म्हटले आहे. 

केंद्र सरकार आणि केंद्रीय बँकांचे एवढे कडक नियम असताना देखील गुन्हेगार फसविण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढत आहेत. डुप्लिकेट सिमद्वारे ऑनलाईन फ्रॉड केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जात बुडालेल्या व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) कंपनीची संकटे काही कमी होण्याचे नाव घेत नाहीएत. राजस्थानच्या आयटी विभागाने कंपनीला डुप्लिकेट सिममुळे एका ग्राहकाला झालेले 27.5 लाख रुपये आणि व्याजाचे 2.31 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. (Rajasthan IT Department order Vodafone Idea to pay customers money after Duplicate sim Fraud.)

कंपनीच्या माहितीशिवाय डुप्लिकेट सिम बनविता येत नाही. यामुळे एका ग्राहकाचे 27.5 लाख रुपये हॅकरने हडप केले. जर व्होडाफोनने य़ा ग्राहकाचा त्याचे पैसे एक महिन्याच्या आत दिले नाहीत तर त्यावर 10 टक्क्यांचे व्याज आकारले जाईल असे आदेशात म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कंपनीने ग्राहकाच्या व्हेरिफिकेशनशिवाय डुप्लिकेट सिम कार्ड जारी केले. याद्वारे त्या गुन्हेगाराने त्या ग्राहकाच्या खात्यातून 68.5 लाख रुपये लंपास केले. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार कंपनीने भानुप्रताप नावाच्या व्यक्तीला हे डुप्लिकेट सिम जारी केले होते, हा नंबर दुसऱ्याच व्यक्तीचा होता. प्रतापने त्या व्यक्तीच्या खात्यातून आईडीबीआय बँकेतून 68. लाख रुपये आपल्या खात्यात वळते केले. तक्रारीनंतर 44 लाख रुपये त्या ग्राहकाच्या खात्यात वळते करण्यात आले. परंतू तोवर प्रतापने 27.5 लाख रुपये उडविले होते. ही रक्कम अद्याप त्या ग्राहकाला मिळालेल नाही. 

25 मे 2017 मध्ये कृष्ण लाल नैन यांचा व्होडाफोन नंबर बंद झाला होता. तेव्हा त्यांनी याची तक्रार व्होडाफोनच्या स्टोअरमध्ये केलेली. मात्र, त्यांना नंबर चालू करून देण्यात आला नाही. अखेर त्यांनी दुसऱ्या गॅलरीमध्ये जात तक्रार दिली, तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांचा नंबर सुरु झाला. मात्र, तोवर त्यांचे पैसे गेलेले होते. 

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनRajasthanराजस्थान