शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:23 IST

...राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. मात्र, सोनम बेपत्ताच होती. पण आता खुद्द सोनमलाच त्यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे.

इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याप्रकरण सध्या संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. हनिमूनसाठी मेघालयात गेलेले इंदूरचे राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम बेपत्ता झाले होते. यानंतर, राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. मात्र, सोनम बेपत्ताच होती. पण आता खुद्द सोनमलाच त्यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे. यात त्याच्यावर दोन वेळा झाल्लाचे समोर आले आहे. एकदा त्याच्या पाठीत वार केला गेला. यानंतर त्याच्या छातीत वार केला गेला. याच हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. 

एनडीटीव्हीने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभिक पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये यासंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. राजा रघुवंशी हत्याकांडातील संशयित आरोपी सोनम रघुवंशी सध्या गाझीपूर पोलीस ठाण्याच्या  कस्टडीत आहे.

काय म्हणाले गाझीपूरचे एसपी? -गाझीपूरचे एसपी डॉ. इराज राजा म्हणाले, आज (9 जून) सकाळी मध्य प्रदेशपोलिसांकडून, एक सोनम नावाची महिला गोरखपूर हायवेवरील काशी ढाब्यावर आहे, अशी सूचना मिळाली होती. ही सूचना मिळताच पोलिसांचा चमू घटना स्थळी दाखल झाला. त्यांना तेथे सोनम आढळून आली. यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. आतापर्यंत काय कारवाई झाली? -या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने राज कुशवाह नावाच्या व्यक्तीसोबत मिळून राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला. माध्यमांतील वृत्तांनुसार, राज कुशवाह सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड कारखान्यात काम करत होता. तेथूनच या दोघांची कथित प्रेम कहाणी सुरू झाली.सोनमचा दावा... -न्यूज१८ ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आपण आरोपी नसून, या प्रकरणातील पीडित आहोत. अपहरण केल्यानंतर आपल्याला उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे सोडण्यात आले होते. यानंतर आपण तेथून आपल्या भावाला फोन केला, असा दावा सोनमने केला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या फोन कॉलसंदर्भात, कुटुंबीयांनी पोलिसांना सूचना दिली. यानंतर, पोलिसांनी सोनमला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस