शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:46 IST

राजा रघुवंशीच्या हत्येचे कोडे सोडवताना पोलिसांच्या मनात आणखी एक संशय निर्माण झाला जेव्हा हनीमूनला आलेल्या सोनमने त्यांच्या सोशल मीडियावर एकही फोटो पोस्ट केला नव्हता

इंदूर - हनीमूनसाठी मेघालयला गेलेले सोनम आणि राजा रघुवंशी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ माजली होती. पोलिसांनी या जोडप्याच्या शोधासाठी दिवसरात्र एक केले. दुर्गम भागात पथके पाठवली. शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु हाती काहीच लागले नाही. सर्वकाही अंधारात तीर मारण्यासारखे झाले होते. पोलीस प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवत होती मात्र कुणालाही काहीच कळत नव्हते. तेव्हा या प्रकरणात एन्ट्री होते स्थानिक गाईड अल्बर्ट पीडी याची...ज्याच्या एका माहितीमुळे पोलिसांना या प्रकरणाच्या आणखी जवळ नेले. त्यातून सोनम रघुवंशीचे षडयंत्र आणि राजाच्या हत्येमागचा चेहरा उघड झाला. 

हिंदी समजली नाही, पण शंका आली

अल्बर्ट पीडी नावाच्या गाईडने पोलिसांना सांगितले की, २२ मे रोजी सोनम आणि राजा यांच्यासोबत अन्य ३ युवक होते. जे नोंग्रियाटहून मावलखियाट  ३ हजार पायऱ्या चढून जात होते. राजासोबत ३ जण पुढे चालले होते तर सोनम त्यांच्या मागे होती. ते सगळे हिंदीत बोलत होते. मला हिंदी फारसे येत नाही परंतु काही ठीक नाही असं वाटले. सोनम यांनी अल्बर्ट यांना सोडून भावानसाई नावाचा दुसरा गाईड ठेवला होता ज्याने त्यांना शिपारा होमस्टे पर्यंत सोडले होते. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ऑपरेशन हनीमून नाव दिले. यात एकूण १२० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी काम करत होते. 

फोटो न टाकण्यावरही आला संशय

राजा रघुवंशीच्या हत्येचे कोडे सोडवताना पोलिसांच्या मनात आणखी एक संशय निर्माण झाला जेव्हा हनीमूनला आलेल्या सोनमने त्यांच्या सोशल मीडियावर एकही फोटो पोस्ट केला नव्हता. एखाद्या नवविवाहित जोडप्यात ही गोष्ट असामान्य आहे. बहुतांश कपल हनीमून ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर टाकतात परंतु सोनम आणि राजा यांचा एकही फोटो समोर आला नाही. गाईडकडून मिळालेल्या सुगाव्यानंतर ही पहिलीच गोष्ट होती ज्यामुळे टीमचा संशय बळावला. 

मर्डरनंतर राजाच्या अकाऊंटवर भावूक पोस्ट

त्याहून मोठी बाब म्हणजे २३ मे दुपारी २.२५ मिनिटांनी राजाच्या सोशल मीडियावर एक पोस्ट अपलोड करण्यात आली त्यात सात जन्मो का साथ असा उल्लेख करण्यात आला. ही पोस्ट त्यावेळी टाकली होती जेव्हा राजाची हत्या करण्यात आली. सोनमने ही पोस्ट टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून राजा जिवंत आहे आणि सर्वकाही सुरळीत आहे हे दिसून येईल असा अंदाज पोलिसांना आला. 

घटनास्थळावरून १० किमी अंतरावरील CCTV फुटेज

तपासावेळी पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले. ज्यात सोनम आरोपी आकाश, विशाल आणि आनंदसोबत क्राइम सीनपासून जवळपास १० किमी अंतरावर बोलताना दिसले. त्याशिवाय घटनास्थळी जे काही पुरावे सापडले त्यामुळे हत्येत सोनमचा सहभाग असल्याची पुष्टी झाली. सोनमने जाणुनबुजून तिचा रेनकोट आकाशला दिला होता. त्यावर रक्ताचे डाग होते, जे ६ किमी दूर अंतरावर झुडूपात सापडले. राजाच्या हत्येनंतर पुरावे मिटवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.

१० दिवसांत रचला कट

या घटनेचा तपास करताना लग्नाच्या अवघ्या १० दिवसानंतरच राजाच्या हत्येचा कट रचला गेल्याचे उघड झाले. सोनम सातत्याने राज कुशवाहा आणि इतर आरोपींच्या संपर्कात होती. हे सर्व आरोपी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबले होते जेणेकरून एकाच परिसरात संशय येऊ नये. हत्येचा हेतू एकच होता राजाचा काटा काढून सोनमला प्रियकर राजसोबत लग्न करायचे होते असं पोलिसांनी म्हटलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी