शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:28 IST

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमसह तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.

इंदूर - मेघालय राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी नवं वळण लागले आहे. या खळबळजनक प्रकरणात आता एका रहस्यमय मुलगी अलकाची एन्ट्री झाली आहे. अलका ही मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिची जवळची मैत्रिण आहे. राजाच्या कुटुंबाने अलकाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत राजाच्या हत्याकांडात तिचाही समावेश असू शकतो अशी शंका उपस्थित केली आहे.

राजाचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी म्हणाला की, अलका आणि सोनम जवळच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे राजाच्या हत्येचा जो कट रचला गेला त्यात तिचाही समावेश असू शकतो. पोलिसांनी तिची कसून चौकशी करावी. त्याशिवाय सोनमची नार्को टेस्ट करावी जेणेकरून या प्रकरणातील सत्य समोर येऊ शकेल अशीही मागणी त्यांनी केली. 

तसेच सोनमसोबत अलकाचे वागणेही संशयास्पद वाटत होते. मेघालय पोलिसांनी अद्याप अलकाच्या भूमिकेबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. सूत्रांनुसार, विशेष तपास पथक अलकाच्या भूमिकेचा शोध घेत आहे. अलका हिच्या एन्ट्रीने या हत्याकांड प्रकरणाचा तपास आणखी जटील बनला आहे. आता तपासात अलकाच्या भूमिकेबाबत काय खुलासा होतो, ती फक्त सोनमची मैत्रिण आहे की हत्याकांडात तिचाही काही हात आहे हे तपासातून समोर येईल. 

दरम्यान, राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमसह तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे. २ जून रोजी सोहराच्या वेइसाडोंग फॉल्सजवळ राजाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला.  त्यानंतर ९ जून रोजी सोनमने गाजीपूर येथे सरेंडर केले. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमची नार्कोटेस्ट केल्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ शकतो असं राजाच्या कुटुंबाने म्हटलं आहे. 

"लग्न ठरल्यानंतरही फारसे बोलत नव्हते"

 लग्नाच्या एक दिवस आधी झालेल्या कार्यक्रमात स्टेजवर सूत्रसंचालकाची भूमिका बजावणारा राजा रघुवंशीचा मित्र राज कुलहारे याने मोठा खुलासा केला आहे. लग्न ठरल्यानंतर सोनम राजाला बोलण्यासाठी वेळच देत नव्हती. राज कुलहारे आणि राजा रघुवंशी हे एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गोष्टी शेअर करायचे. राज कुल्हारे याने मुलाखतीत सोनम आणि राजा रघुवंशीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. "लग्न ठरल्यानंतर राजा आणि सोनम दिवसातून फक्त १० मिनिटं बोलत होते. अनेकदा सोनम व्यस्त असल्याचं कारण दाखवून राजाशी बोलण्यास नकार देत असे."  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी