शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राज कुंद्रा करणार होता ‘त्या’ अभिनेत्रींचे लाइव्ह स्ट्रीमिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 10:27 IST

राज कुंद्रा याच्या व्हायरल व्हॉट्सॲप चॅटमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने पॉर्न बिझनेस बंद होऊ नये म्हणून हॉटशॉट ॲप बंद झाल्यास प्लान बी तयार केला होता. यात, पॉर्न फिल्मचे शूटिंग थांबवून त्याच्या ‘बॉलिफेम’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मॉडेल आणि अभिनेत्रींकडून लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची तयारी त्याने केली होती. राज कुंद्रा याच्या व्हायरल व्हॉट्सॲप चॅटमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यातून कोट्यवधींची उलाढाल सुरू होती. मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या उमेश कामतच्या चौकशीतून कुंद्रा याचे अनेक राज बाहेर आले. कामतने गुुन्हे शाखेला दिलेल्या माहितीत लंडनस्थित असलेल्या केनरिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रदीप बक्षी हे राज कुंद्रा याचे भाऊजी आहेत. राज कुंद्रा याने ५ फेब्रुवारी २०१९ रोजी भागीदारीत आर्म्स प्राइम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन करून केनरिन कंपनीसाठी हॉटशॉट हे ॲप विकसित केले. पुढे जुलै ते ऑगस्ट २०१९  या कालावधीत हे ॲप २५,००० डॉलर किमतीला केनरिन कंपनीला विकले. कुंद्रा याच्या सांगण्यावरून कामत हा केनरिन प्रायव्हेट कंपनीचा भारतातील को-ऑर्डिनेटर  म्हणून कुंद्रा याच्या कंपनीच्या कार्यालयातून याचे कामकाज पाहत होता. पुढे, ११ डिसेंबर २०१९ रोजी कुंद्रा याने या कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचा कर्मचारी रायन थॉर्प हा हॉटशॉट ॲपबाबत माहिती घेत होता. याच ॲपवरून पॉर्न फिल्म प्रसारित करण्यात येत होत्या.

गुगल प्लेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हॉटशॉट डिजिटल ॲप्लिकेशन १८ नोव्हेंबरला बंद केले. मात्र, चॅटमधील मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांनी असे काही झाल्यास प्लान बी यापूर्वीच तयार ठेवला होता. पॉर्न फिल्मचे शूटिंग थांबवून त्याच्या ‘बॉलिफेम’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मॉडेल आणि अभिनेत्रींकडून लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची तयारी त्याने केली होती.

कोट्यवधी कमावल्याचा संशय 

कुंद्राने पॉर्न फिल्म आणि वेबसीरिज बनविण्यासाठी अर्थपुरवठा केला आहे. एक पॉर्न फिल्म बनविण्यासाठी पाच ते सात लाख रुपये खर्च येत होता. पुढे या माध्यमातून राज कुंद्रा याने कोट्यवधी रुपये कमावल्याचा पथकाला संशय आहे.  

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राCrime Newsगुन्हेगारी