शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Raj Kundra: खुलासा! राज कुंद्राच्या कार्यालयात आढळली गुप्त तिजोरी; गैरकारनाम्यांचे 'राज' आता उघड होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 07:15 IST

चार कामगार होणार साक्षीदार; बनवायचा रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप 

ठळक मुद्दे बेकायदेशीर कारनाम्यांचे ‘राज’ आता कुंद्रा याच्याच कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून उघड होण्याची शक्यताकार्यालयात कामाला असलेल्या चार कामगारांनी त्याच्या गैरकृत्यांची पोलखोल केली राज कुंद्राने कानावर हात ठेवले असले तरी अन्य उपलब्ध पुराव्यांमधून त्याचा सहभाग उघड होत आहे.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुंद्रा याच्या अंधेरी येथील वियान इंडस्ट्रीज कंपनीच्या कार्यालयात शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात अनेक महत्त्वपूर्ण पुरावे जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये एका गुप्त तिजोरीचाही समावेश आहे. त्यात कुंद्राच्या व्यवसायासंबंधी अनेक महत्त्वाच्या फाइल्स आहेत. एका ब्रिटिश कंपनीसोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहितीही त्यातून समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, बेकायदेशीर कारनाम्यांचे ‘राज’ आता कुंद्रा याच्याच कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून उघड होण्याची शक्यता आहे. त्याच्या कार्यालयात कामाला असलेल्या चार कामगारांनी त्याच्या गैरकृत्यांची पोलखोल केली आहे. पोलिसांकडून त्यांना साक्षीदार बनविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यांचा सविस्तर जबाब नोंदविला जात आहे. ‘हॉट शॉट’च्या कन्टेंटसाठी रोज नवा व्हॉट्स ॲप ग्रुप बनवला जायचा, असाही खळबळजनक खुलासा झाला असल्याचे समजते. 

पोर्नोग्राफीप्रकरणी राज कुंद्राने कानावर हात ठेवले असले तरी अन्य उपलब्ध पुराव्यांमधून त्याचा सहभाग उघड होत आहे. अंधेरीच्या ऑफिसमधील कामगारांची चौकशी करण्यात आली. त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत बरीच माहिती दिली असल्याने पोलिसांना भक्कम पुरावे उपलब्ध होणार आहेत. या चौघांना साक्षीदार करण्याचे अधिकाऱ्यांनी ठरविले आहे. हे रॅकेट कसे चालायचे, राजचा त्याच्यात किती सहभाग होता, त्याने त्यांना त्याबाबत काय सूचना केल्या होत्या, याचा जबाब तपशीलवार नोंदवून घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तपासात कुंद्राची नकारघंटा कायमगेल्या सोमवारपासून गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या ताब्यात असलेल्या राज कुंद्राने आपल्या कृत्याची अद्याप कबुली दिलेली नाही. हॉट शॉटच्या निर्मितीमध्ये आपला कसलाही सहभाग नाही, केवळ चार महिने मेंटेनन्सची जबाबदारी सांभाळली होती, त्या कालावधीत काय बनविण्यात आले व कोणत्या ‘फॉरमॅट’मध्ये उपलब्ध केले गेले, याची माहिती आपल्याला नसल्याचा दावा त्याने केला आहे.

चौकशीवेळी शिल्पा रडलीशिल्पा शेट्टीची जुहूमधील बंगल्यात शुक्रवारी सुमारे ६ तास चौकशी झाली. काही प्रश्नांची उत्तरे देताना ३ ते ४ वेळा तिला अश्रू रोखता आले नाहीत.

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राPoliceपोलिस