शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्न फिल्म प्रकरण: राज कुंद्रा, रायन थॉर्पची जामिनावर सुटका नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 06:59 IST

न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाने या दोघांच्या जामीन अर्जावरील निकाल २ ऑगस्ट रोजी राखून ठेवला होता.

मुंबई : अश्लील चित्रपटांची निर्मिती करून त्या प्रसारित केल्याप्रकरणी अटकेत असलेला व्यावसायिक व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा व त्याच्या कंपनीतील आयटी प्रमुख रायन थॉर्प यांची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने शनिवारी नकार दिला.न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाने या दोघांच्या जामीन अर्जावरील निकाल २ ऑगस्ट रोजी राखून ठेवला होता. या प्रकरणात कुंद्रा व थॉर्प हे १९ जुलैपासून अटकेत आहेत. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज २८ जुलै रोजी फेटाळले. त्यानंतर त्यांनी अटक कारवाईच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या. न्या. गडकरी यांनी या दोघांचा युक्तिवाद फेटाळत म्हटले की, दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली कोठडी कायद्यास अनुसरून आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही.या दोघांनाही आपल्याला बेकायदेशीरपणे अटक केल्याचे याचिकेत म्हटले होते. अटक करण्यापूर्वी फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) ४१ (ए) दिली नाही. ४१ (ए) कलमानुसार, आरोपीला अटक करण्याची आवश्यकता नसेल तर पोलीस त्याला समन्स बजावून त्याचा जबाब नोंदवू शकतात. मात्र, पोलिसांनी कायद्याने बंधनकारक असलेली नोटीस बजावली नाही, असे कुंद्रा याने  उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.राज्य सरकारने कुंद्राच्या जामिनावर आक्षेप घेतला होता. आरोपी पुरावे नष्ट करत असताना तपास यंत्रणा बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. कुंद्राच्या कार्यालयातील लॅपटॉपमधून पोलिसांना ६८ पॉर्न व्हिडिओ सापडले. आधी ५१ व्हिडिओ जप्त केले होते. तसेच हॉटशॉट व बॉलीफेम या दोन ॲपची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आढळली, असे पै - कामत यांनी न्यायालयाला सांगितले होते. 

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्रा