शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Raj Kundra Pornography Case : राज कुंद्रा यांना तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 23:18 IST

Raj Kundra Pornography Case : कुंद्रा यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, कुंद्रा यांची अटक बेकायदेशीर आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले नाही.

मुंबई : पोर्नोग्राफीक फिल्म्सची निर्मिती करून तिचे वितरण केल्याप्रकरणी आरोपी असलेले व्यावसायिक व  अभनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. सरकारी वकिलांची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही दिलासा देणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 

 

राज कुंद्रा यांनी त्यांच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर २९ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाने पोलिसांना दिले. 

 

राज कुंद्रा यांना मुंबई क्राईम ब्रँचने २९ जुलै रोजी अटक केली. अटकेनंतर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच कुंद्रा यांनी केलेल्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी ठेवली. 

 

कुंद्रा यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, कुंद्रा यांची अटक बेकायदेशीर आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले नाही. सीआरपीसी कलम ४१ (ए) अंतर्गत कुंद्रा यांना आधी नोटीस बजवायला हवी होती. त्यानंतर त्यांना अटक करायला हवी होती. मात्र, पोलिसांनी नोटीस बजावण्याची कायदेशीरप्रक्रिया डावलून कुंद्रा यांना थेट अटक केली. 

 

मात्र, मुख्य सरकारी वकील अरुणा पै- कामत यांनी हा आरोप फेटाळला. पोलिसांनी कुंद्रा यांना नोटीस बजावूनच अटक केली, असे पै- कामत यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने सरकारी वकिलांना या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. पोंडा यांनी तोपर्यंत कुंद्रा यांना अंतरिम दिलासा देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. 

 

सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकल्याशिवाय एकतर्फी अंतरिम दिलासा देणारी नाही, असे न्या. गडकरी यांनी म्हटले. पोलीस ज्या गोष्टी पोर्नोग्राफिक असल्याचा दावा करत आहेत त्यामध्ये थेट लैंगिक दृश्ये किंवा शारीरिक संबंध दाखविण्यात आलेले नाहीत.एखाद्या लघुपटात प्रणय दृश्ये दाखविण्यात येतात तशी आहेत. ती दृश्ये पाहणारा फारतर कामातुर होऊ शकतो. त्यामुळे पोलीस माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ (ए)  आपल्यावर लावू शकत नाहीत. फरतर कलम ६७ (कामातुर कंटेट प्रसिद्ध करणे) अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, असे याचिकेत म्हटले आहे.

 

कुंद्रा यांच्या अटकेनंतर क्राईम ब्रँचने कुंद्रा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. कुंद्रा यांच्या कार्यालयावर घातलेल्या धाडीत ५१ अश्लील व्हीडिओ जप्त केल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राPoliceपोलिसMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय