शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Raj Kundra : राज कुंद्राकडून मुंबई पोलिसांना सापडल्या ५१ पॉर्न फिल्म्स; सरकारी वकिलाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 16:26 IST

Raj Kundra : वकिलाने सांगितले की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्याकडून खूप मजबूत पुरावे मिळाले आहेत.

ठळक मुद्देसरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलिसांना 2 अॅप्समधून 51 पॉर्न चित्रपट सापडले आहेत. राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांनी Whats App ग्रुप आणि चॅट्स डिलीट करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपांनी घेरलेल्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा याच्या प्रकरणाची शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयाला अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. वकिलाने सांगितले की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्याकडून खूप मजबूत पुरावे मिळाले आहेत.सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलिसांना 2 अॅप्समधून 51 पॉर्न चित्रपट सापडले आहेत. राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांनी Whats App ग्रुप आणि चॅट्स डिलीट करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अशाप्रकारे, हे लोक या प्रकरणाशी संबंधित पुरावे नष्ट करत होते, म्हणून त्यांना अटक करणे आवश्यक होते. राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांनी त्यांच्या अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि त्या अटकेला 'बेकायदेशीर' म्हटले आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सुनावणीत सरकारी वकिलांनी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाला सांगितले की, आरोपींवर  पॉर्न कॉन्टेंट स्ट्रीम  करण्याच्या गंभीर आरोपांना सामोरे जावे लागत आहे आणि पोलिसांना त्यांच्या फोन आणि स्टोरेज उपकरणांमधून महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. पुढे त्यांनी सांगितले की, राज कुंद्रा आणि लंडनमध्ये राहणारे त्यांचे मेहुणे (प्रदीप बक्षी) यांच्यातील हॉटशॉट्स अॅपवर ईमेल देखील प्राप्त झाले आहेत. प्रदीप बक्षी या मेहुण्याला हॉटशॉट्स अॅपचे मालक असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राHigh Courtउच्च न्यायालयShilpa Shettyशिल्पा शेट्टीMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटक