शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात रेल्वेच्या ई-तिकिट विक्रीचा पर्दाफाश, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 21:26 IST

रेल्वेच्या  ई तिकेट विक्री च्या काळाबाजाराचा  येथील रेल्वे  सुरक्षा दलाने पर्दाफाश करताना  गोव्यातील  मडगाव  येथील  एका दुकानावर छापा मारुन  2 लाख 60हजार रुपये किंमतीची एकूण 119 ई तिकीटेजप्त केली व दोघाजणांच्या मुसक्या आवळल्या.

मडगाव -  रेल्वेच्या  ई तिकेट विक्री च्या काळाबाजाराचा  येथील रेल्वे  सुरक्षा दलाने पर्दाफाश करताना  गोव्यातील  मडगाव  येथील  एका दुकानावर छापा मारुन  2 लाख 60हजार रुपये किंमतीची एकूण 119 ई तिकीटेजप्त केली व दोघाजणांच्या मुसक्या आवळल्या. मडगावच्या मोबाईल वर्ल्ड  या दुकानातून रेल्वेच्या ई तिकिटाचा काळाबाजार होत असल्याची माहिती  रेल्वे सुरक्षा  दलाला मिळाली होती.  या माहितीच्या आधारे सापळा रचून त्या दुकानावर छापा टाकून दुकानमालक अजरून गिरवोळी (23) व त्याचा भागीदार रिषी मिश्र (26)  या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे लॅपटॉप,मोबाईल, व अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या. मागाहून संशयिताना न्यायालयापुढे उभे केले असता  त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. बोगस एजंट खाजगी युजर्स आयडीचा वापर करुन  या तिकिटांचे आरक्षण करीत होते. मागाहून दुप्पट दराने  ती ग्राहकांना  विकली जात होती. अशा पध्दतीने तिकिटे घेणो हा रेल्वे कायदय़ांतर्गत गुन्हा आहे. प्रत्येक तिकिटामागे संशयित अंदाजे पाचशे रुपये जादा रक्कम ग्राहकांकडून घेत होते असेही तपासात आढळून आले.ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत देशभरात अशा बोगस एजंटविरुद्ध  कारवाई सुरु करण्यात आली असून, शहरात मडगाव तसेच लगतच्याभागात  रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणारे रॅकेटच कार्यरत असल्याचा रेल्वे सुरक्षा दलांना संशय आहे.  या गैरव्यवहारात सामील असलेल्यावर लवकरच कारवाई होण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndian Railwayभारतीय रेल्वेgoaगोवा