शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रायगड पोलिसांना तिसऱ्या डोळ्याची साथ, CCTV मुळे ४२ गुन्हे उघडकीस

By निखिल म्हात्रे | Updated: January 11, 2023 18:25 IST

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत.

अलिबाग : रायगडपोलिसांना गुन्ह्यांची उकल करताना तिसऱ्या डोळ्याची महत्त्वपूर्ण साथ मिळत आहे. रायगड जिल्ह्यात पोलिसांनी नागरिक, संस्था, आस्थापना यांच्या मदतीने ठिकठिकाणी १२ हजार ४९२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चित्रीकरणामुळे या मागील वर्षभरात महत्त्वाचे ४२ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. जिल्ह्यात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. मागील २०२२ या वर्षभरात रायगड पोलिसांनी नागरिक, संस्था, आस्थापना यांच्या सहकार्याने ठिकठिकाणी सुमारे ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १२ हजार ४९२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असून, ते सर्व चालू स्थितीत आहेत.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे. यामुळे नागरिकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात दिवसाला ६ ते ७ गुन्ह्यांची नोंद होत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. तर दुकानदारांचा होणार सन्मान दुकानदार, क्लाॅथ सेंटर, ज्वेलर्स, दूध डेअरी मालकांनी सीसीटीव्ही लावताना ते रस्त्याच्या दिशेने लावा, जेणेकरून संशयित हालचालींवर लक्ष राहील. तर दुसरीकडे या सीसीटीव्हीमुळे एखादा गुन्हा डिटेक्ट झाला, तर संबंधित दुकानदाराला पोलिसांच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत सद्य:स्थितीत १२ हजार ४९२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे गुन्ह्यांचा तपासादरम्यान उपयुक्त ठरत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमुळे वर्षभरात ४२ गुन्हे उघडकीस आणण्यात मदत झाली आहे. जिल्हाभरातील पोलिसिंग अधिक फास्ट करीत जिल्ह्यातील अतीगंभीर ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, रायगड.

 

टॅग्स :RaigadरायगडalibaugअलिबागPoliceपोलिस