लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सदरमध्ये सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर शुक्रवारी छापा घातला. तेथे हुक्का पिताना आढळलेले ग्राहक आणि हुक्का पार्लरच्या व्यवस्थापकासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.हब कॅफे लाऊंज नामक हुक्का पार्लर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छावणी परिसरात एका बोळीत सुरू होते. तेथे येणाऱ्या ग्राहकांकडून मोठी रक्कम घेऊन वेगवेगळ्या तंबाखूजन्य फ्लेवरचे मिश्रण असलेले पॅकेट्स आणि हुक्का उपलब्ध करून दिला जात होता. ही माहिती कळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी हुक्का पार्लरवर छापा घातला. यावेळी तेथे आरोपी बलविंदरसिंग अवतारसिंग (रा. अशोक चौक पाचपावली) आणि कुणाल हरीशकुमार सचदेव (रा. हेमू कॉलनी चौक जरीपटका) हे दोघे हुक्का पिताना आढळले. हुक्का पार्लरचा व्यवस्थापक आरोपी अमन विनोद पाटील तसेच रितिक राजेश ताकसांडे आणि अंकित स्टीवर हे ग्राहकांना हुक्क्याची सेवा देताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी या पाचही आरोपींना ताब्यात घेतले. या हुक्का पार्लरचा मालक आरोपी रोमिओ रेमंड मायकल आहे. तो शिवनगरी, भिलगाव येथे राहतो.गुन्हे शाखेच्या पथकाने उपरोक्त पाच आरोपींना अटक केली. या पाच तसेच पार्लरचा मालक रोमियो मायकलसह सहा जणांविरुद्ध सदर ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलापोलिसांशी संगनमतगेल्या अनेक दिवसांपासून प्रतिबंध असतानाही हे हुक्का पार्लर दिवस-रात्र सुरू होते. येथे तरुण तरुणीची मोठी गर्दी राहत होती. सदर ठाण्यातील काही भ्रष्ट मंडळीना महिन्याला तगडी देन मिळत असल्यामुळे कोरोनाच्या काळातही हे हुक्का पार्लर बिनधास्त सुरू होते, अशी चर्चा आहे. या कारवाईमुळे सदर पोलिसांचे बिंग फुटले असून हुक्का पार्लरकडे दुर्लक्ष करणाऱ्या सदर ठाण्यातील भ्रष्ट मंडळींवर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात, त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
नागपुरातील सदरमध्ये हुक्का पार्लरवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 00:05 IST
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सदरमध्ये सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर शुक्रवारी छापा घातला. तेथे हुक्का पिताना आढळलेले ग्राहक आणि हुक्का पार्लरच्या व्यवस्थापकासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नागपुरातील सदरमध्ये हुक्का पार्लरवर छापा
ठळक मुद्देव्यवस्थापकासह पाच जण ताब्यात : मालकावरही गुन्हा दाखल