शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राहुल द्रविडचा 19 वर्षांखालील संघातील सहकाऱ्याची आत्महत्या

By पूनम अपराज | Updated: October 10, 2020 16:52 IST

Suicide : सुरेश कुमार यांनी 1990 साली अंडर-19च्या टीममधून केरळचे प्रतिनिधीत्व केलं होतं. केरळमधून अंडर-19च्या टीममध्ये खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.

ठळक मुद्देसुरेश कुमारने काल रात्री राहत्या घरात बेडरूममध्ये आत्महत्या केली. आज सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली.

राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करणारा क्रिकेटपटू एम. सुरेश कुमार (४७) यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. सुरेश कुमार यांनी 1990 साली अंडर-19च्या टीममधून केरळचे प्रतिनिधीत्व केलं होतं. केरळमधून अंडर-19च्या टीममध्ये खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.सुरेश कुमारने काल रात्री राहत्या घरात बेडरूममध्ये आत्महत्या केली. आज सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश यांचा मृतदेह त्यांच्या मुलाने पहिलास्पिनर सुरेश कुमारने 1990 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. त्यावेळी राहुल द्रविड अंडर-19च्या संघाचा कर्णधार पद भूषवलं होतं. त्यावेळी सुरेश कुमार आताचे आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जचे कोच आणि न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग आणि जलदगती गोलंदाज डियोन नॅशच्या विरोधात मैदानात उतरला होता. केरळने 1994-94मध्ये रणजी करंडक जिंकला होता. तामिळनाडू विरुद्ध झालेल्या या सामन्यातील विजयात सुरेश कुमारचा मोलाचा वाटा होता. रणजी करंडकमध्ये सुरेशने 164 धावा देऊन 12 बळी घेतले होते. त्यानंतर 1995-96 मध्येही रणजी करंडकमध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सुरेश यांनी हॅट्रिक केली होती.

 

सुरेश यांनी झारखंडविरुद्धचा रणजी सामना खेळल्यानंतर 2005 साली क्रिकेट क्षेत्रातून संन्यास घेतला होता. त्यानंतर रेल्वेसोबत काम करू लागले. सुरेश यांनी त्यांच्या करिअरमध्ये 72 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 196 बळी घेतले होते. दरम्यान, त्यांनी 51 लिस्ट ए सामन्यातही सहभाग घेतला होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक बड्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत विकेट घेतली होती. 

टॅग्स :Suicideआत्महत्याKeralaकेरळPoliceपोलिसRahul Dravidराहूल द्रविडRanji Trophyरणजी करंडक