शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

Raghunath Kuchik, Rape Case: तिला दुसरी पूजा चव्हाण होऊ देऊ नका; शिवसेना नेत्याचा फोटो टाकत चित्रा वाघ यांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 12:57 IST

Raghunath Kuchik, Rape Case: पीडित मुलीने फेसबुकवर पोस्ट टाकत माहिती दिली आहे. त्यात तिने लिहिले आहे ,की मी स्वतःला संपवत आहे. तिने जर तिच्या जीवाच काही बारवाईट केलं तर त्याची जबाबदारी कुचिकसह पुणे पोलीस प्रशासन व राज सरकाराची आहे, असेही वाघ म्हणाल्या.

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (raghunath kuchik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊनही जामीन मिळाला. पोलिसांनी न्यायालयात केस लावून का धरली नाही?, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (bjp chitra wagh) यांनी केला होता. आज त्यांनी आणखी एक व्हिडीओ जारी करत कुचिक हे पिडीतेला केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. 

'मी अत्यंत व्यथित होऊन हा व्हिडीओ करत आहे. शिवसेनेचे पुण्याचे नेते रघुनाथ कुचिक, यांना राज्यमंत्री पदाचा दर्जाही दिलेला आहे. अश्या बलात्काऱ्याने  तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर जबरदस्तीने त्या मुलीचा गर्भपात केला. याबाबत त्या पीडित मुलीने समोर येऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या. एवढ्या गोष्टी, पुरावे असतानाही त्याला जामीन कसा काय मिळतो माहीत नाही', अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. 

जामीनावर बाहेर असलेल्या या आरोपीकडून पीडितेवर दबाव निर्माण केला जात आहे. ही केस मागे घे म्हणून मेसेजेस तिला करतोय. हे मेसेजेस कुणाला दाखवायचे त्यांना दाखव मला काही फरक पडत नाही, अशी धमकी ही त्या मुलाला दिली जातेय, असा आरोप वाघ यांनी केला. याचबरोबर त्याच्यामागे त्याचा कर्ताकरविता धनी कोण आहे. याबाबत पीडित मुलीने फेसबुकवर पोस्ट टाकत माहिती दिली आहे. त्यात तिने लिहिले आहे ,की मी स्वतःला संपवत आहे. तिने जर तिच्या जीवाच काही बारवाईट केलं तर त्याची जबाबदारी कुचिकसह पुणे पोलीस प्रशासन व राज सरकाराची आहे, असेही वाघ म्हणाल्या.

याचबरोबर ही मुलगी जिवंत आहे, तिला वाचवा. तिची पूजा चव्हाण होऊ देऊ नका, अशी विनंतीही चित्रा वाघ यांनी केली आहे. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघPuneपुणेShiv Senaशिवसेना