शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचावर जातीवाचक शेरेबाजी, दोघांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 23:17 IST

ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व उपसरपंच यांनी सरपंचांना जातीवाचक बोलून अपमान केला. तर आणखी एकाने त्यांच्यावर सिद्ध न झालेले आरोप करून एकेरी उल्लेख करीत सोशल मीडियावर पत्र व्हायरल करून बदनाम केले असल्याची घटना घडली आहे.

नेरळ : येथे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच हे अनुसूचित जमातीचे आहेत. मात्र ते आपले ऐकत नसल्याचा राग मनात धरून ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व उपसरपंच यांनी त्यांना जातीवाचक बोलून अपमान केला. तर आणखी एकाने त्यांच्यावर सिद्ध न झालेले आरोप करून एकेरी उल्लेख करीत सोशल मीडियावर पत्र व्हायरल करून बदनाम केले असल्याची घटना घडली आहे. या घटनेने व्यथित झालेल्या सरपंचांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोघांवर अनुसूचित जाती जमाती अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी व आर्थिक उलाढाल असलेली नेरळ ग्रामपंचायत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूकदेखील प्रतिष्ठेची समजली जाते. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत येथील थेट सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. तेंव्हा झालेल्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेचे अनुसूचित जमातीचे उमेदवार रावजी शिंगवा यांनी बाजी मारली होती. ५ जुलै रोजी विद्यमान सरपंच रावजी शिंगवा हे नेरळ-आंबेवाडी फाट्याजवळ उभे असताना माजी सदस्य व उपसरपंच केतन पोतदार हे त्यांच्याजवळ आले. आपल्या सांगण्याप्रमाणे शिंगवा हे ऐकत नाहीत याचा राग मनात धरून शिंगवा यांना जातीवाचक शब्द उच्चारून तेथे त्यांचा अपमान केला; तर दुसरीकडे रस्ता चोरी प्रकरणात ज्यांच्या घरापासून रस्ता मंजूर होता त्या अजित सावंत यांनी शिंगवा यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून एकही आरोप सिद्ध नसताना बदनामीकारक वाक्य असलेले नेरळ शिवसेनेच्या बुरुजाजवळ भ्रष्टाचार करो ‘ना’ अशा मथळ्याचे पत्र लिहून ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे व्यथित झालेल्या नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठले. झालेल्या प्रकाराची फिर्याद त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात दिली. या अनुषंगाने नेरळ पोलीस ठाण्यात केतन पोतदार व अजित सावंत यांच्यावर अनुसूचित जाती/जमाती अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर हे करीत आहेत.परस्परांवर केले होते भ्रष्टाचाराचे आरोपगेले सहा महिने ते ग्रामपंचायतीचा कारभार हा सहकारी सदस्य यांच्यासोबत करीत आहेत. मात्र मागील काही दिवसांत ग्रामपंचायत नेरळमधील सदस्य शिवाली रासम-पोतदार यांच्याकडून ग्रामपंचायतमधील १४ वित्त आयोगमधून बांधण्यात आलेल्या कचराकुंडी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. वरिष्ठ पातळीवर त्याची चौकशीदेखील झाली; मात्र हे आरोप सिद्ध झाले नाहीत. दरम्यान, याच कालावधीत माजी सदस्य व उपसरपंच केतन पोतदार यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात रस्ता न करता बिल काढल्याचा आरोप झाला होता. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाRaigadरायगड