शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

घोटाळेबाजांची तिमाही! सरकारी बँकांत तब्बल १९ हजार कोटींचे घोटाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 06:10 IST

१२ सरकारी बँकांपैकी एसबीआयमध्ये २,०५० घोटाळे झाले. त्यात २,३२५.८८ कोटी रुपये अडकले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांच्या काळात सरकारी मालकीच्या बँकांत तब्बल १९,९६४ कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील सर्वाधिक घोटाळे स्टेट बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ इंडिया या बँकांत झाले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जावर रिझर्व्ह बँकेने अधिकृतरीत्या ही माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, एप्रिल-जून २०२० या तिमाहीत देशातील सरकारी बँकांत घोटाळ्यांची २,८६७ प्रकरणे समोर आली. त्यात १९,९६४ कोटी रुपयांचे घोटाळे झाले. घोटाळ्याच्या सर्वाधिक घटना एसबीआयमध्ये घडल्या. मात्र, घोटाळ्यातील रकमेच्या बाबतीत बीओआय प्रथम स्थानी आहे. पंजाब नॅशनल  बँक आणि युनियन बँक आॅफ इंडियामध्ये सर्वांत कमी घोटाळे झाले. पंजाब नॅशनल बँकेत घोटाळ्याच्या २४० घटना घडल्या आहेत. मात्र, घोटाळ्यातील रक्कम २७०.६५ कोटी रुपये आहे. युनियन बँक आॅफ इंडियात ४९ प्रकरणांत ४६.५२ कोटी रुपयांचे घोटाळे झाले.आरबीआयने काय म्हटले?च्रिझर्व्ह बँकेने म्हटले की, १२ सरकारी बँकांपैकी एसबीआयमध्ये २,०५० घोटाळे झाले. त्यात २,३२५.८८ कोटी रुपये अडकले. बीओआयमध्ये ४७ प्रकरणांत ५,१२४.८७ कोटी रुपयांचे घोटाळे झाले. कॅनरा बँकेतील ३३ प्रकरणांत ३,८८५.२६ कोटींचे, तर बँक आॅफ बडोदामध्ये ६० प्रकरणांत २,८४२.९४ कोटी रुपयांचे घोटाळे झाले. इंडियन बँकेतील ४५ प्रकरणांत १,४६९.७९ कोटी रुपयांचे घोटाळे झाले.च्इंडियन ओव्हरसीज बँकेत ३७ प्रकरणांत १,२०७.६५ कोटी रुपयांचे, तर बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये ९ प्रकरणांत १,१४०.३७ कोटी रुपयांचे घोटाळे झाले. युको बँकेत १३० प्रकरणांत ८३१.३५ कोटी रुपयांचे, तर सेंट्रल बँक आॅफ इंडियात १४९ प्रकरणांत ६५५.८४ कोटी रुपयांचे घोटाळे झाले.

टॅग्स :fraudधोकेबाजीBanking Sectorबँकिंग क्षेत्र