शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पिंपरीत दोन गटात हाणामारी ; नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:50 IST

पिंपरी येथे एका हॉटेलमध्ये मंगळवारी(दि.२६) मध्यरात्री दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार करण्यात आले.

पिंपरी : पिंपरी येथे एका हॉटेलमध्ये मंगळवारी(दि.२६) मध्यरात्री दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने वार करण्यात आले. तर नगरसेवकास मारहाण करत दहशत माजवली. तसेच नगरसेवकाच्या गटाने जातीयवाचक शिवीगाळ करुन, बेकायदेशीर जमाव जमवत बेदम मारहाण केली. या बाबत पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.  नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी (४९, रा.पिंपरी) यांनी फिर्यादी नुसार सचिन राकेश सौदाई (३२), सनी राकेश सौदाई (२८), सुनील मुकेश शर्मा (२२, रा. सर्व पिंपरी), अजय टाक, तुषार दुलेकर, गोलू व इतर ५ ते ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.तर सचिन राकेश सौदाई (३३, रा. पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नगरसेवक डब्बू आसवानी, लखु भोजवनी, जीजू, आशिष आसवानी, सनी सुखेचा, लखन सुखेचा, भरत आसवानी गुन्हा दाखल केला आहे.नगरसेवक आसवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सलोनी हॉटेल येथे झाला. सचिन सौदाई याचा वाढदिवस असल्याने आसवानी यांच्या सलोनी हॉटेलमध्ये सौदाई व इतर आले होते. या ठिकाणी हे जबरदस्तीने दारू आणि बियरचे बॉक्स मागवत होते. यास मनाई केल्याने त्यांनी गोंधळ घातला. याची माहिती मिळाल्यानंतर डब्बू आसवानी हॉटेलवर गेले असता पैसे देऊन घेऊन जा असे म्हटल्याने चिडून टोळक्याने राडा केला. टोळक्याने शिवीगाळ करून आसवानी यांचा मुलगा आशिष याला मारहाण केली. त्यावेळी सोडविण्यासाठी गेल्याने डब्बू आसवानी यांनाही मारहाण केली. कोयत्याने वार केले, बाटली फेकून मारली. तसेच पिस्तूलाच्या मागील बाजूने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. 

सचिन सौदाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्याचे मित्र हॉटेल सलोनी येथे गेले होते. त्यावेळी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी मागील निवडणुकीत मदत न केल्याचा राग मनात धरून जातीयवाचक शिवीगाळ केली. बेकायदेशीर जमाव जमवून वाद घातला. तसेच सिमेंट गट्टू, लाथा बुक्याने तसेच काचेच्या बॉटलने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस