शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

कासारवाडीत विनयभंग करून तलावारीने वार ; परस्परविरोधी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 16:06 IST

जागेवरून दोन गटांमध्ये वाद झाला....

पिंपरी : जागेवरून दोन गटांमध्ये वाद झाला. तलवारीसारख्या हत्याराने तसेच तलवारीने वार करण्यात आले. यात एका महिलेचा विनयभंग झाला. कासारवाडी येथे सोमवारी (दि. १६) सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार करण्यात आली असून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात अम्रितसिंग लालसिंग गिल (वय ३६, रा. शगुन चौक, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जॉन डॉमनिक फर्नांडीस, मायकल डॉमनिक फर्नांडीस (वय ३२) रोजी डॉमनिक फर्नांडीस (वय ३०, रा. कासारवाडी) यांच्यासह तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी जॉन याला अटक करण्यात आली आहे. कासारवाडी येथे महामार्गालगत नर्मदेश्वर महादेव मंदिराशेजारी सोमवारी सायंकाळी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली. फिर्यादी गिल यांना त्यांची कासारवाडीतील जागा खाली कर नाही तर तुला आज संपवतो अशी धमकी दिली. शिवीगाळ करून आरडाओरड व दहशत निर्माण केली. आरोपी जॉन याने त्याच्याकडील तलवारीसारख्या हत्याराने मारण्याचा प्रयत्न केला असता फियार्दी गिल यांनी ते हत्यार त्यांच्या हाताने पकडले. त्यावेळी आरोपी मायकल व रोजी व त्यांच्या सोबतच्या इतरांनी फिर्यादी गिल यांना मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या महिलेचा आरोपी मायकल याने विनयभंग केला.दुसºया प्रकरणात जॉन डॉमनिक फर्नांडीस यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित लालसिंग गिल याच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी जॉन व त्यांचा भाऊ मायकल व रोजमेरी व रोझी अ‍ॅॅलन रॉडरिक्स त्यांच्या जागेतून चहाच्या टपरीवरून चहा पिऊन जात होते. त्यावेळी आरोपी गिल आणि इतर आरोपी तेथे आले. तेरा हमेशा का नाटक है तुझे मालूम हैना यह जगह मेरी है, असे म्हणून आरोपी गिल याने फिर्यादीला दमदाटी केली. त्यानंतर तलवारीने  वार करून फियार्दीच्या हाताच्या बोटांना जखम केली. यावेळी फियार्दी यांची बहीण रोझी भांडणे सोडविण्यास आल्या असता त्यांना आरोपीच्या हातातील तलवारीची मूठ लागल्याने जखम झाली. तसेच आरोपींनी दगडफेक केली. या फियार्दी व त्यांचा भाऊ मायकल यांच्या डोक्यास मार लागून जखमी झाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस