शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मित्राकडून कामगाराचा डोक्यात दगड घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:49 IST

भाजी आणण्यासाठी कोणी पैसे द्यायचे, या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्याची घटना उघड झाली आहे.

न-हे  -  भाजी आणण्यासाठी कोणी पैसे द्यायचे, या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्याची घटना उघड झाली आहे़किरण काटकर (वय २८, रा़ येवलेवाडी ता़ हवेली) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे़ नºहे येथील अभिनव कॉलेज मार्गावरील स्वराज डेव्हलपर्स बांधकाम साइटवरील पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान घडली़याप्रकरणी आत्माराम महादेव जाधव (वय ४९, रा़ बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली असून पप्पू पाटील (वय २८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़किरण काटकर आणि पप्पू पाटील हे दोघे एकमेकांचे मित्र होते़ ते बांधकाम साइटवरील पत्र्याच्या शेडमध्ये एकत्र रहात होते़ सोमवारी त्यांच्यात भाजी आणण्यासाठी पैसे कोण देणार, यावरून भांडणे झाली होती़ काटकर याने आत्माराम जाधव यांना बोलावून घेतले़ तेव्हा त्यांनी १०० रुपये दिले व चिकन आणण्यास सांगितले़ मात्र, पप्पू पाटील हा चिकनऐवजी अंडी घेऊन आला़ त्यावरून रागाच्या भरात काटकर याने पप्पूला मारले़ तेव्हा त्याने बघून घेण्याची धमकी दिली़ त्यानंतर तिघेही न जेवता झोपी गेले़ जाधव हे सकाळी सहा वाजता उठून प्रात:विधीसाठी बाहेर गेले असताना पप्पू पाटील याने झोपलेल्या काटकर याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला व तो पळून गेला़या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, बाजीराव मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संगीता यादव, आदींनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप हे करीत आहेत.आमच्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये तीन तरुण राहत होते. त्यामधील दोघांमध्ये दारू पिऊन रात्रभर कडाक्याची भांडणे चालू असल्याचा आवाज आम्हाला येत होता. मात्र, सकाळी त्यातील एक जण प्रात:विधीसाठी जाऊन परत येईपर्यंत हा प्रकार घडला.- संगीता वाघमारे,शेजारी राहणाऱ्यासुरक्षारक्षकाची पत्नी

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी