शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाव दिला नाही, म्हणून तुफान राडा... दुकान फोडलं, मारहाण केली! चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

By नारायण बडगुजर | Updated: July 15, 2023 18:49 IST

डोक्यात, हातावर आणि पाठीत लोखंडी रॉडने केला वार

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: भुर्जी पाव दिले नाही म्हणून दुकानाची तोडफोड करण्याची आणि मारहाण झाल्याची घटना पिंपरीत घडली. भाई असल्याचे सांगून चौघांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चौफुला चौक, भोसरी येथे गुरुवारी झाला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.

मेघराज वैजनाथ मंटाळे (वय ३२, रा. संत तुकाराम नगर, भोसरी, मूळ रा. हौदरुल, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. १४) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पिल्या उर्फ सुदर्शन राक्षे (वय २३), करण गुरुनाथ राठोड (वय २५), पत्या उर्फ प्रथमेश दिलीप कांबळे (वय २०, सर्व रा. भोसरी) आणि करण राठोड या मित्रांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंटाळे भोसरी येथील चौफुला चौकात भुर्जीचे दुकान लावतात. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आरोपी त्यांच्या दुकानावर आले. दोन भुर्जी आठ पाव दिले नाहीत, म्हणून करण राठोड याने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. तसेच, हातावर आणि पाठीत रॉडने मारहाण करून त्यांना जखमी केले.

फिर्यादीच्या दुकानातील कामगार परवीन यांच्या पोटात आरोपींनी लाथा मारल्या. त्यावेळी परवीन हिचे पती हुसेन हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता आरोपीने त्यांना देखील लाकडी बॅटने मारहाण केली. तसेच, राक्षे याने हुसेन यांच्या खिशातील आठ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. येथे धंदा करायचा असेल तर, आम्हाला पाहिजे ते लगेच द्यावेच लागेल, असे म्हणून आरोपींनी दुकानातील साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर करण राठोड आणि कांबळे यांनी हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तुला महित नाही का, मी भोसरीचा भाई आहे, आम्हाला जे पाहिजे असते ते लगेच द्यावे लागेल, नाही दिले तर मारून टाकीन, अशी धमकी आरोपींनी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी