नोएडा: यूट्यूबर आणि ‘बिग बॉस’ ओटीटी सिझन दोनचा विजेता एल्विश यादव याला रेव्ह पार्ट्यांमध्ये विष पुरवल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याला १० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.नोएडा पोलिसांनी वन्यजीव संरक्षण कायद्याप्रकरणी एल्विशला अटक केली होती. फॉरेन्सिक अहवालाने पुष्टी केली होती की चाचणीसाठी पाठवण्यात आलेला विषाचा नमुना कोब्राचा होता. भाजप खासदार मनेका गांधी यांच्या संस्थेचे अधिकारी म्हणून काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी एफआयआर दाखल केला होता.
सापाचे विष पुरवले; यूट्यूबर, ‘बिग बॉस’ OTT सिझन दोनचा विजेता एल्विश यादव जेलमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 06:42 IST