शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेश्या व्यवसायासाठी बंगलाच घेतला भाड्याने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 21:34 IST

महिला दलालाला अटक, ३ युवतींची सुटका

पणजी - जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होत असलेला गोवा हे  वेश्या व्यवसायाचा अड्डा बनविण्याच्या दृष्टीनेही दलालांची लॉबी कार्यरत आहे. वेश्या व्यवसायासाठी हरमल पेडणे येथे एक बंगलाच भाड्याने घेवून तो वेश्या व्यवसायासाठी वापरण्यात आला.  गुन्हा अन्वेषण विभागाच्या छाप्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली आहे. या प्रकरणात महिला दलालाला अटक करण्यात आली आहे तर तिघा युवतींची सुटका करण्यात आली आहे. 

मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी मैना या टोपणनावाने हा धंदा चालविणाऱ्या महिला दलालाला पुराव्यासह अटक केली. त्या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन युवतींची पोलिसांकडून सुटका करण्यात आली. त्यांना मेरशी येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. सुटका करण्यात आलेल्या तीन युवतींपैकी एक दोन युवती या मुंबईच्या आहेत तर तिसरी युवती ही अहमदनगर जिल्ह्यातील आहे.  पोलीस कारवाई करून युवतींची मंगळवारी रात्री सुटका करण्यात आली असली तरी त्या तीन दिवसांपूर्वीपासूनच या बंगल्यात राहत होत्या अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. गिऱ्हाईक  मिळविण्याचे काम आॅनलाईन पद्धतीने चालू होते. अटक करण्यात आलेली महिला दलाल त्यात महत्त्वाची भूमिका बजावत होती. पैशांचे व्यवहारही तीच करीत होती अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

गुन्हा अन्वेषण विभागाला ही माहिती मिळताच निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या बंगल्यावर छापा टाकला आणि दलाल महिलेला अटक केली. तसेच युवतींची सुटका केली. एकीला अटक करण्यात आलेले असले तरी एवढा मोठा व्याप हा एक महिला सांबाळू शकणार नाही आणि या रेकेटचे आणखी सूत्रधारही आहेत याची पोलिसांना कल्पना आहे. तूर्त संशयि महिलेला ५ दिवसांच्या रिमंडवर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. 

मैना नायक ऊर्फ तबसूम अली

या संपूर्ण सेक्स रेकेटच्या तपासाचा केंद्रबिंदू बनलेल्या संशयित मैना नायक ऊर्फ तबसूम मसशैद अली हिला अटक करून ५ दिवसांची कोठडीही मिळविली आहे. बंगल्यात ठेवल्या गेलेल्या युवती गोव्यात कुणी आणल्या. बंगला भाड्याने घेण्यासाठी व्यवहार व करार कूणी केले,  गिऱ्हाईकांशी कोण संपर्क करतो अशा अनेक प्रश्नांची माहिती उत्तरे तिच्याकडून पोलीस मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट