शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशकुमारला माफीचा साक्षीदार करण्यास अभियोग पक्षाची ना हरकत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 21:10 IST

बसुराज खून प्रकरण : मात्र संशयित पंकज पवार याच्या वकिलाकडून हरकतीचा मुद्दा

मडगाव - अंगावर शहारे आणणाऱ्या बसुराज बारकी खून खटल्यात आपल्याला माफीचा साक्षीदार करावा यासाठी या प्रक़रणातील एक संशयित सुरेशकुमार सोळंकी याने केलेल्या अर्जाला सरकारी वकील व्ही. जे. कोस्ता यांनी सहमती दिली असली तरी अन्य एक संशयित पंकज पवार याची बाजू मांडणारे अ‍ॅड. राजीव गोमीस यांनी हरकत घेतल्याने ही सुनावणी 4 ऑक्टोबपर्यंत तहकूब करण्यात आली.दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सायोनोरा लाड यांच्या न्यायालयात सोमवारी हे प्रकरण सुनावणीस आले असता. संशयित सोळंकी याला माफीचा साक्षीदार करण्यास अभियोग पक्षाची कुठलीही हरकत नसल्याचे सरकारी वकील कोस्ता यांनी सांगितले. मात्र, पवार याच्या वकिलानी सोळंकी याला ही सवलत देण्यास विरोध केला. आपली हरकत लेखी स्वरुपात ते 4 ऑक्टोबरला मांडणार आहेत. दरम्यान, संशयित पंकज पवार याने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला असून या अर्जावरही 4 रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, आपल्या अनैतिक संबंधात व्यत्यय येत असल्यामुळे आपला पती बसुराव बारकी याचा आपल्या मित्रच्या सहाय्याने खून करुन नंतर निर्घृणरित्या त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची वासालात लावण्याचा आरोप असलेल्या कल्पना बारकी हिच्यासह पंकज पवार, आदित्य गुज्जर, अब्दुल करीम शेख व सुरेशकुमार सोळंकी यांच्यावर ठेवण्यात आला होता. कल्पनाने आदित्यच्या सहाय्याने आपल्या पतीचा गळा दाबून खून केला. नंतर पंकज व अब्दुलच्या सहाय्याने त्या मृतदेहाचे तुकडे करुन ते गोणपाटात भरुन जंगलात नेऊन टाकले. 2 एप्रिल 2018 रोजी कुडचडे येथे एका फ्लॅटमध्ये हे कृत्य घडले होते. मात्र या खुनाला वाचा तब्बल एका महिन्याने फुटली होती.आपल्या पतीचा आपण कशारितीने खून केला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची कशी वासालात लावली याबद्दलची सर्व माहिती कल्पनाने सुरेशकुमार याला दिली होती. ज्या नायलॉन दोरीने बसूराजचा गळा आवळला ती दोरी नष्ट करण्याचे काम सुरेशकुमारने केले होते. नंतर सुरेशकुमारने केपे न्यायालयासमोर दिलेल्या स्वेच्छा जबाबात ही सर्व माहिती उघड केली होती. आपल्या इतर सहका:यांविरोधात साक्ष द्यायला आपण तयार असल्याचे त्याने सत्र न्यायालयात सांगितले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनCourtन्यायालय