शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

घबाड सापडले! सनदी अधिकाऱ्याकडे १५० कोटींची मालमत्ता; पूजा सिंघल यांच्यावर ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 06:15 IST

झारखंड, बिहारसह देशाच्या अनेक राज्यांत दुसऱ्या दिवशीही छापे मारण्यात आले. पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांना ताब्यात घेतले आहे.

एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्करांची : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आयएएस अधिकारी व झारखंडमधील खनन व उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. यात १५० कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचे दस्तावेज मिळाले आहेत.

झारखंड, बिहारसह देशाच्या अनेक राज्यांत दुसऱ्या दिवशीही छापे मारण्यात आले. पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांना ताब्यात घेतले आहे. आजवर १९.३१ कोटींची रोकड जप्त केली आहे. खुंटीच्या मनरेगा घोटाळ्यात ईडी त्यांच्यावर एवढी मोठी कारवाई करील, याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. 

ईडीने आता सीबीआयला पत्र लिहिले असून, गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सीबीआय गुन्हा दाखल करू शकतो. पूजा सिंघल खुंटी व चतरामधील मनरेगा घोटाळ्यातही अडकलेल्या आहेत.

पतीच्या हॉस्पिटलवर ईडीची नजर n पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांच्या पल्स रुग्णालयावरही ईडीची नजर आहे. यामार्फत मनी लाँड्रिंग केल्याचा संशय आहे. मनी लाँड्रिंगसाठी मेधांश हॉस्पिटल प्रा. लि. ची स्थापना करण्यात आली. n त्यानंतर पल्स संजीवनी हेल्थ केअर प्रा. लि. नावाने कंपनी बनवून तिचे एकत्रीकरण केले. पल्स संजीवनी हेल्थ केअर प्रा. लि.मध्ये अभिषेक झा हे एम. डी. आहेत. n पूजा यांचे बंधू सिद्धार्थ सिंघल, अभिषेक झा यांची बहीण अमिता झा व दीप्ती बॅनर्जी हेही संचालक आहेत. याच पत्त्यावर मेधांश हॉस्पिटल प्रा. लि. आहे. या दोन्हींचे २०१६ मध्ये एकत्रीकरण झाले. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय