शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीच्या उंबरठ्यावरील निरीक्षकांना बढती; १५२ अधिकाऱ्यांना होणार फायदा

By जमीर काझी | Updated: February 28, 2023 10:41 IST

- जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : राज्य पोलिस दलातील गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या निरीक्षकांच्या पदोन्नतीला आता मुहूर्त ...

- जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : राज्य पोलिस दलातील गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या निरीक्षकांच्या पदोन्नतीला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या काही दिवसांत १५२ अधिकाऱ्यांना सहायक आयुक्त, उपअधीक्षक  म्हणून बढती  दिली जाणार आहे. त्याबाबतचा अंतिम प्रस्ताव गृहविभागाला सादर केला आहे.  गेली ३०, ३२ वर्षे कार्यरत असलेले हे अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून, त्यांच्या वर्दीवरील लाल पट्टी होळीच्या मुहूर्तावर हटवली जाईल, अशी माहिती गृहविभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

  पोलिस दलात १९९१ व ९२  या साली उपनिरीक्षक म्हणून भरती झालेल्या अधिकाऱ्यांपैकी १६० जणांना  ऑक्टोबर २०२१ मध्ये सहायक आयुक्त, उपअधीक्षक म्हणून बढती दिली. त्यानंतर सव्वा वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पदाेन्नतीची नवीन यादी जारी केली जात नव्हती. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये निरीक्षकांच्या बदल्यावेळी ३२ अधिकाऱ्यांना पदोन्नतीसाठी पात्र ठरवून त्यांना तत्कालीन पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यामुळे बढतीचे आदेश लवकर निघतील, अशी अपेक्षा होती. मात्र मार्च महिना उजाडावा लागला.   आता पीआयचे प्रमोशन झाल्याने या पदाच्या आणखी जागा रिक्त होतील, त्यामुळे महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील  पदोन्नती समितीची बैठक घेऊन एपीआय, पीएसआयच्या बढतीची संख्या निश्चित होईल.

पदोन्नती आली १७५ वरून १५२ जणांसाठीएसीपीच्या बढतीसाठी सेवाज्येष्ठतेनुसार १७५ अधिकारी पात्र ठरत होते. मात्र त्याला विलंब लागल्याने त्यातील अनेकजण निवृत्त झाले, तर काहींनी बढती नाकारली आहे. त्यामुळे सध्या १५२ जणांना बढती दिली जाणार आहे. 

टॅग्स :Policeपोलिस