शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटात काम देण्याच्या अमिषाने वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या निर्मात्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 20:35 IST

Arrested by Police : त्याच्यासह अन्य दोघांना पकडण्यात आले आहे. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. 

ठळक मुद्देपरमानंद याने , ये ताकत है इश्क की , बुड्ढ़ा बीघड गया हे दोन हिंदी चित्रपट बनवले असल्याचे सांगीतले जाते.

मीरारोड -  चित्रपटात काम देतो सांगून तरुणींना वेश्याव्यवसायास लावणाऱ्या परमानंद बालचंदानी (६८) या सी ग्रेड चित्रपट निर्मात्यास मीरारोड मधून अटक केली आहे. त्याच्यासह अन्य दोघांना पकडण्यात आले आहे. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. 

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना माहिती मिळाली की, मीरारोडच्या विदिशा शांती निकेतन इमारतीत वेश्या व्यवसाय चालवला जातो. त्या अनुषंगाने पाटील व त्यांच्या पथकातील उमेश पाटील, ढेमरे , रामचंद्र पाटील ,  विजय निलंगे , गावडे, शिंदे व महिला पोलीस यंबर , चव्हाण यांनी गुरुवारी सापळा रचून कारवाई केली. 

परमानंद हा तरुणींना चित्रपटात काम देतो सांगून वाममार्गाला लावत असे. त्याचा निकटवर्तीय कन्हैलाल सह वनिता इंगळे रा. चेणे ही महिला दलाल यात सहभागी होती, याने चित्रपटात काम देण्याच्या अमिषाने महिलांना वाममार्गाला लावणाऱ्या चित्रपट निर्माता व एक इसम तसेच एका महिलेला अटक केली आहे. हे दोघे तरुणी व ग्राहक आणायचे काम करत.

परमानंद याने , ये ताकत है इश्क की , बुड्ढ़ा बीघड गया हे दोन हिंदी चित्रपट बनवले असल्याचे सांगीतले जाते. पिडित तरुणीचे फोटो ग्राहकांना व्हाट्सअप वर पाठवत होता.गेल्या १० वर्षांपासून इमारतीमधील रहीवाशांना डॉक्टर असल्याचे सांगत होता. अनेक तक्रारी करूनही पदाधिकारी दखल घेत नसल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.  मीरारोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसmira roadमीरा रोडProstitutionवेश्याव्यवसाय